अतिवृष्टीतून सुटलो वाटताच सोयगावला गारपीटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 19:07 IST2021-10-08T19:06:55+5:302021-10-08T19:07:19+5:30
rainfall in Aurangabad आज दुपारी अकरा गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला

अतिवृष्टीतून सुटलो वाटताच सोयगावला गारपीटीने झोडपले
सोयगाव : अतिवृष्टीच्या उघडपीनंतर आज दुपारी तालुक्यातील बहुलखेडा ते बनोटी भागाला गारांच्या पावसाने झोडपले. यामुळे वेचणीवर आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानीची दाहकता वाढली आहे.
आज दुपारी अकरा गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर तासभर विजांच्या कडकडाटाने सोयगाव शहर हादरले होते. मात्र, येथे पावसाने हजेरी लावली नाही. तर घोसला शिवारात पावसासह दहा मिनिटे गारपीठ झाली. यामुळे कपाशीच्या बोंडांना गळती लागली, वेचणीवर आलेला कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले. निम्म्या सोयगाव तालुक्यात गारांच्या पावसाचा मारा झाल्यानंतरही महसूल विभागाने पाहणीची तसदीही घेतली नसल्याचे चित्र आहे.