गणवेश वाटपाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:31 AM2017-09-26T00:31:32+5:302017-09-26T00:31:32+5:30

शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन जिल्ह्यात बारगळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेशासाठी शासनाकडून २ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रूपयांचा निधी शिक्षण विभागास देण्यात आला. मात्र अजूनही गणवेश वाटपाची प्रक्रिया गुलदस्त्यातच आहे.

Sparkle of uniforms | गणवेश वाटपाचे भिजत घोंगडे

गणवेश वाटपाचे भिजत घोंगडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन जिल्ह्यात बारगळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेशासाठी शासनाकडून २ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रूपयांचा निधी शिक्षण विभागास देण्यात आला. मात्र अजूनही गणवेश वाटपाची प्रक्रिया गुलदस्त्यातच आहे.
सर्व शिक्षा अभियानअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना दरवर्षी राबविली जाते. यंदा २०१७-१८ मध्ये ७४ हजार ७९४ मुले-मुली योजनेसाठी पात्र आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मात्र दिवाळी जवळ आली तरीही गणवेश मिळाले नाहीत. शिवाय शिक्षण खात्याकडे गणवेश योजनेचा अहवालही अद्याप सादर करण्यात आला नाही. शाळा उघडताच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट होते. तसेच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व शिक्षाकडून विद्यार्थ्यांची माहिती गुगलफार्मवर मागविण्यात आली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. योजनाही प्रभावीपणे राबविली जात नाही.

Web Title: Sparkle of uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.