‘चिंग्स का तडका’ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Published: May 15, 2014 12:11 AM2014-05-15T00:11:08+5:302014-05-15T00:32:38+5:30
औरंगाबाद : चायनीज म्हटले की चटकदार जेवण डोळ्यासमोर येते.
औरंगाबाद : चायनीज म्हटले की चटकदार जेवण डोळ्यासमोर येते. चवदार चायनीज पदार्थ कसे तयार करायचे याची माहिती टी.व्ही.वर शेफ हरपालसिंग सोखी देत असतात. रेसिपीजचे प्रशिक्षण देणारे शेफ हरपालसिंग सोखी यांच्यासोबत प्रत्यक्ष चायनीज रेसिपी शिकण्याचा आनंद आज सखींनी लुटला. लोकमत सखी मंच व चिंग्सच्या वतीने ‘चिंग्स का तडका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शेकडो सखींच्या उपस्थितीत लोकमत भवनच्या हॉलमध्ये बुधवारी पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शेफ हरपालसिंग सोखी यांच्या हस्ते झाले. लोकमत इव्हेंट व्यवस्थापक सुहास शहाणे यांच्या हस्ते हरपालसिंग सोखी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिंग्सचे असिस्टंट मॅनेजर रिमा शहा, सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी, तसेच कमिटीचे मेंबर मनीषा सोनी, गीता अग्रवाल यांची उपस्थिती होती. यावेळी थ्री पेपर पनीर, आलू कॉर्न पकोडे, क्रिस्पी बेबी कॉर्न, चायनीज पोहे, अशा विविध पदार्थांचा आस्वाद सखींनी घेतला. सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून सोखी यांनीही हसत खेळत छोटे- छोटे विनोद करीत चविष्ट सल्लेही दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. उपस्थित महिलांनी प्रत्यक्ष शेफ हरपालसिंग सोखी यांच्यासोबत पाककृती करण्याचा अनुभव घेतला. चायनीज पदार्थ तयार करणे किती सोपे आहे, त्यात किती विविधता आणता येऊ शकते याचा अनुभव त्यांनी घेतला. रोजच्या जेवणातही चायनीज तडका कसा आणता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक शेफच्या मार्गदर्शनाखाली सखींनी घेतले. कोणत्याही पदार्थाला दिली जाणारी फोडणी आणि त्यात वापरण्यात येणार्या पदार्थांचे प्रमाण यावर चविष्टपणा अवलंबून असतो. वेगवेगळ्या प्रकारचे चिंग्स मसाले, चटणी, सॉस, सूप यांच्या वापराने झटपट चवदार पदार्थ बनविण्याचे तंत्र शेफ हरपालसिंग सोखी यांनी शिकविले.