प्रेम से बोलो जय महावीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:24 AM2018-03-30T00:24:22+5:302018-03-30T00:25:46+5:30
‘महावीर का क्या संदेश-जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने गुरुवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढली. जैन समाजासह अन्य समाजबांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले.
औरंगाबाद : ‘महावीर का क्या संदेश-जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने गुरुवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढली. जैन समाजासह अन्य समाजबांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ‘भारताच्या विकासात जैन समाजाचे योगदान’ यावर आधारित देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेतून भक्ती, शक्ती, शिस्त, स्वच्छता, सेवाभाव, दातृत्वाचा नवा आदर्श सर्वांसमोर निर्माण केला. हेच या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे फलित ठरले.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे औरंगाबादेत काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेची ख्याती संपूर्ण देशभर पसरली आहे. ही शोभायात्रा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी राज्यासह परराज्यांतील लोक शहरात आले होते. साधू-संतांच्या उपस्थितीने समाजबांधवांचा आनंद द्विगुणित झाला होता. ‘प्रेम से बोलो जय महावीर, ‘मिलकर बोलो जय महावीर’, ‘ एक दो तीन चार जैन धर्म की जयजयकार’ असा जयघोष करीत प्रचंड उत्साहात शोभायात्रा निघाली होती. सुमारे तीन तास नॉनस्टॉप जल्लोष, चैतन्य सर्वांनी अनुभवले.
सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांतून युवकांनी वाहन रॅली काढली होती. सर्व वाहन रॅली महावीर उड्डाणपूल चौकात पोहोचल्या. यानंतर ७.१५ वाजता महावीर स्तंभ येथे, ७.३० वाजता उस्मानपुरा येथील उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालयात सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. त्यानंतर गुरुगणेशनगरात आ. सुभाष झांबड यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. यावेळी प्रशांत देसरडा, महावीर पाटणी, जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया व सर्व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
महावीर जयंती उत्सवात जैन समाजासह अन्य समाजबांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, कल्याण काळे, अंबादास दानवे, नामदेव पवार, जी. एस. अन्सारी, प्रशांत देसरडा, विकास जैन, राजू तनवाणी, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, दयाराम बसैये, हुशारसिंग चव्हाण, अनिल मकरिये, बबन डिडोरे, मनीषा भन्साळी तसेच सकल जैन समाजाचे जी. एम. बोथरा, ललित पाटणी, प्रकाश बाफना, डॉ. शांतीलाल संचेती, डॉ. अनिल नहार, सुधीर साहुजी, दिगंबर क्षीरसागर, वृषभ कासलीवाल, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा, जिनदास मोगले, रवी मुगदिया, संजय संचेती, विलास साहुजी, डॉ.प्रकाश झांबड, प्रकाश मुगदिया, डॉ. सन्मती ठोले, तनसुख झांबड, अॅड. डी. बी. कासलीवाल, चंदनमल पगारिया, अशोक अजमेरा, दिलीप मुगदिया, जव्हेरचंद डोसी, नरेंद्र गेलडा, संजय सेठिया, संजय साहुजी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे मुकेश साहुजी, भारती बागरेचा, अनिलकुमार संचेती, करुणा साहुजी, रमेश घोडके, भावना सेठिया, मिठालाल कांकरिया, राजेश मुथा, मंगला गोसावी, नीलेश पहाडे, मधू जैन, मंजू पाटणी, विकास रायमाने, संतोष पापडीवाल, संजय सुराणा, मनोज छाबडा, नीलेश सावलकर, रवी लोढा, नीलेश जैन, अमृतलाल साहुजी, राजेंद्र पगारिया, नरेंद्र अजमेरा, सुनील वायकोस, कुंतीलाल हिरण, पंकज साकला, अंकुर साहुजी, अजित जैन, राहुल जोगी, प्रवीण भंडारी, कल्पेश गांधी, संतोष संचेती, सुनील बोरा. महिला समितीच्या अध्यक्षा मंगल पारख, कविता अजमेरा, मीना पापडीवाल, वासंती काळे, सुनीता सेठिया, स्मिता संचेती, पुष्पा बाफना, पल्लवी शहा, नीता ठोले आदी समाजबांधवांची उपस्थिती होती.
शोभायात्रेत कल्पकता, नावीन्याची अनुभूती
औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत विविध भागांतून चित्ररथ आले होते. विविध देखाव्यांतून धार्मिक व सामाजिक संदेश देण्यात आला होता. तसेच देशाच्या विकासात जैन समाजाच्या योगदानाची माहिती देणारा देखावाही लक्षवेधी ठरला. देखाव्यात चिमुकले व महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. शोभायात्रेतील देखाव्यांनी डोळ्यांचे पारणे फिटले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया शहरवासीयांनी व्यक्त केल्या.
शोभायात्रेत अग्रभागी भगवान महावीर मंदिर, सुराणानगर येथील महिला चालत होत्या. सर्वांनी एकाच रंगातील साड्या परिधान केल्या होत्या. तसेच प्रेरणा स्वाध्याय मंडळाच्या महिलाही रांगेत चालत होत्या. प्रत्येक महिलेच्या हाती धार्मिक संदेश लिहिलेले फलक होते. जैन श्वेतांबर तेरापंथ सभेच्या वतीने अहिंसा यात्रा यावरील देखावा तयार केला होता. शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळाने ‘मुनीश्री संपन्नकीर्तीजी म. सा. यांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावा केला होता. भारतीय जैन संघटना व पाणी फाऊंडेशनच्या जलसंवर्धनाच्या कार्याची माहिती देणारे फलक एका वाहनात लावण्यात आले होते. जोहरीवाडा येथील संस्कार महिला मंडळाने भगवंतांच्या जन्माचा देखावा सादर केला. महिला भगवंतांचा पाळणा हलवत गीत म्हणत होत्या. राजाबाजार येथील सुमतीसागर पाठशाळा व पुलक लिटिल चॅम्पच्या वतीने जीवनातील ‘चार गती’वर आधारित सजीव देखावा केला होता. शिवाजीनगर येथील भगवान मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिराच्या चित्ररथात चोवीस तीर्थंकरांचे नाव व त्यांनी दिलेल्या संदेशाचे फलक लावण्यात आले होते. लहान मुलांनी प्रत्येक तीर्थंकराच्या नावाचे फलक हाती घेतले होते. ओला व सुका कचरा वेगळा कसा करावा याचा देखावा पी. यू. जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला होता. राजाबाजार महिला मंडळाने भगवंतांच्या महामस्तकाभिषेकाचा देखावा साकारला होता.
विष्णूनगरमधील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराने महावीर भगवंत व शेषनागाच्या कथेवर आधारित देखावा तर कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल जैन मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘स्वर्णसंयम कीर्तिस्तंभ’ची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरली. सर्वार्थ सिद्धी हातमाग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने हातमागावर टॉवेल, वस्त्र तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत होते. लुक अॅण्ड लर्न, जैन ज्ञानधामच्या वतीने भगवान महावीर मार्गदर्शन करताना बालकांनी केलेल्या सजीव देखाव्याने सर्वांना आकर्षित केले. हडकोतील चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराच्या चित्ररथात ‘भारताच्या विकासात जैन समाजाचे योगदान’ याची माहिती देण्यात आली होती. जयभवानीनगर येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने नियोजित मंदिराची प्रतिकृती मांडण्यात आली होती. बालाजीनगरातील कल्पतरू कुंथुनाथ खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराच्या वतीने भगवान महावीर पंचकल्याणक महोत्सवाचा देखावाही उत्तम ठरला. सिडकोतील ज्युनिअर रॉयल जैन ग्रुपच्या वतीने ‘स्वच्छ सुंदर शहर’ या विषयावर जनजागृती करण्यात आली.
पैठणगेट येथून मुख्य शोभायात्रेला सकाळी ९.३० वाजता सुरुवात झाली. यावेळी आचार्य कुशाग्रनंदीजी म. सा.,नवीनसागरजी म. सा., मुनीश्री आगमसागरजी म. सा., पुनीतसागरजी म. सा., सहजसागरजी म. सा. आदी साधू-संतांनी सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढविला. आचार्यजींनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. यानंतर ढोल-ताशांच्या निनादात शोभायात्रेला सुरुवात झाली. ‘देशाच्या विकासात जैन समाजाचे योगदान’ तसेच धार्मिक व सामाजिक विषयांवरील ४० देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले होते. टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा रोड, शहागंजमार्गे शोभायात्रा राजाबाजारात पोहोचली. औरंगपुºयातील स. भु. मैदानावर महाप्रसादी, रक्तदान शिबीर, वृक्षांचे वाटप आदी कार्यक्रम पार पडले.
विविध भागांतून निघाल्या दुचाकी रॅली
महावीर स्तंभ चौकात धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी शहरातील विविध भागांतून दुचाकी रॅली काढण्यात आली. यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता. यात राजाबाजार, महावीर भवन, जाधवमंडी, सिडको, हडको, पुंडलिकनगर, वाळूज आदी भागांतून दुचाकी रॅली काढण्यात आली. प्रत्येक दुचाकीवर ध्वज लावण्यात आले होते. महावीर भवन येथून जय गुरु मिश्री युवा मंडळाच्या वतीने बुलेट रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कुंतीलाल हिरण, सचिन समदडिया, केतन साहुजी, मयूर बोरा आदी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये अनेक जण सपत्नीक सहभागी झाले.
विविध मित्रमंडळांतर्फे खाद्यपदार्थांचे वाटप
शोभायात्रेत श्रमपरिहारासाठी विविध मित्रमंडळांच्या वतीने शीतपेय, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येत होते. यासाठी जागोजागी स्टॉल लावण्यात आले होते. शीतपेय, मुरंबा, कुल्फी, बिस्किट पुडे, चॉकलेट, पाणी वाटप करण्यात येत होते.
स्वच्छतेचा आदर्श
शोभायात्रा मार्गावर विविध मित्रमंडळांच्या वतीने शीतपेय, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. यामुळे निर्माण झालेला कचराही लगेच उचलून रस्ता स्वच्छ, साफ करण्यात आला. रस्ते स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात डॉ. शांतीलाल सिंगी, पद्माकर कदम, पारस चोरडिया, संभाजी