आजारी उद्योगांसाठी विशेष अभय योजना

By Admin | Published: September 9, 2014 11:54 PM2014-09-09T23:54:38+5:302014-09-09T23:56:12+5:30

हिंगोली : राज्यात पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे.

Special Abbey Scheme for sick industries | आजारी उद्योगांसाठी विशेष अभय योजना

आजारी उद्योगांसाठी विशेष अभय योजना

googlenewsNext

हिंगोली : राज्यात पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे. समतोल औद्योगिक विकास घडविण्यासाठी व त्याद्वारे आर्थिक विकास साधण्यासाठी आणि नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी व त्याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ नुसार ही योजना राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील संबंधित लाभार्थ्यांनी घेण्याचे घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे. पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांची जमिनीसकटची स्थिर मालमत्ता वापरात येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग घटकांना विशेष अभय योजनेद्वारे सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. १ वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या किंवा न्यायालयाकडून नादार-दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुनरूज्जीवन नसलेला उद्योग घटक घटकाच्या व्यवस्थापनामध्ये बदल होवून, घटक पुढे यशस्वीरित्या चालू रहावा. या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या घटकांनी राज्य शासनाची सर्व मुदलाची रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व दंड व्याज माफ केले जाईल. सदर योजना ही शासनाची सर्व प्रकारची देणी म्हणजे विक्रीकर, वीज वितरण कंपनीची मूळ रक्कम, व्याज, दंड व्याज इत्यादीसह जो रक्कम येईल ती सर्व रक्कम थकबाकी समजण्यात येईल. सदर योजना निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या व महामंडळे यांच्याकडील थकित देण्यासाठी लागू राहील. सदर योजना शासनाने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत राबवली होती. या योजनेस माहे मार्च २०१५ अखेरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Special Abbey Scheme for sick industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.