‘समृद्धी’च्या जमीन संपादनाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:21 AM2017-11-13T00:21:10+5:302017-11-13T00:21:13+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

 Speed ​​up the land acquisition of 'prosperity' | ‘समृद्धी’च्या जमीन संपादनाला गती द्या

‘समृद्धी’च्या जमीन संपादनाला गती द्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.
बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे जिल्हाधिका-यांनी शनिवारी समृद्धी महामार्गत जमीन जाणा-या दहा गावांतील शेतक-यांची बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी नेटके, तहसीलदार प्रवीण पांडे यांची यावेळी उपस्थिती होती.
बदनापूर तालुक्यातील गेवराई, दुधनवाडी, केळीगव्हाण, भाकरवाडी, गेवराईबाजार, राजेवाडी इ. दहा गावांमधील सुमारे ४५० शेतक-यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. काही गावांमध्ये बागायती जमीन जिरायती दाखविल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. याची जिल्हाधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकºयांची बाजू जाणून घेतली. शेतक-यांनी रीतसर दाखल केलेले आक्षेप व हरकती लवकरात लवकर निकाली काढाव्यात, जमीन संपादनाला गती देण्यासाठी गावनिहाय नियुक्त नायब तहसीलदारांनाही या वेळी शेतक-यांची संवाद साधून त्यांना मोबदला व खरेदी प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

Web Title:  Speed ​​up the land acquisition of 'prosperity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.