नांदेड विभागात वाढणार रेल्वेंची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:14 PM2019-05-20T23:14:35+5:302019-05-20T23:15:00+5:30

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Speed of railway speed in Nanded section | नांदेड विभागात वाढणार रेल्वेंची गती

नांदेड विभागात वाढणार रेल्वेंची गती

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षेला प्राधान्य : १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे होणार काम


औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
एप्रिल २००३ मध्ये हैदराबाद विभागातून वेगळे होऊन नांदेड विभाग अस्तित्वात आला. नांदेड रेल्वे विभाग हा प्रामुख्याने सिंगल लाईन म्हणजे एकेरी मार्ग असलेला विभाग आहे. त्यामुळे मोठा लाईन ब्लॉक घेऊन काम करणे अवघड होते. मोठ्या लाईन ब्लॉकने बऱ्याच रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. यामुळेच नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी गेल्या १५-१६ वर्षांत रेल्वे रूळ बदलण्याचे कार्य हाती घेऊ शकले नाहीत. यामुळे सध्याच्या रेल्वे रुळावरून रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने (वेगाने) धावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून रेल्वेगाड्यांची गती वाढविण्याची आणि त्या नियोजित वेळेवर चालविण्याची मागणी होत आहे.
त्यामुळे नांदेड विभागाने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेंची गती वाढविण्यासाठी रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे कार्य लवकरच हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घ्यावा लागेल. यामुळे काही रेल्वेगाड्या धावतील, काही रेल्वेगाड्यांची वेळ बदलावी लागेल. गरज पडल्यास काही गाड्या रद्द कराव्या लागतील. त्यासंदर्भात प्रवाशांना विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.
जनतेने सहकार्य करावे
सुरक्षेत आणि सेवेत वाढ करण्यासाठी नांदेड विभागाकडून रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम सुरूकरण्यात येत आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी केले आहे.

Web Title: Speed of railway speed in Nanded section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.