औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:15 PM2019-07-02T23:15:18+5:302019-07-02T23:15:46+5:30

औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रोडावली आहे. याप्रकरणी खा. राजकुमार धूत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे.

Speed up the work of Aurangabad-Jalgaon road | औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला गती द्या

औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला गती द्या

googlenewsNext
ठळक मुद्देखा. राजकुमार धूत : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून दिले निवेदन

औरंगाबाद : औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रोडावली आहे. याप्रकरणी खा. राजकुमार धूत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे.
खा. धूत यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले. मात्र, काम कासवगतीने सुरू आहे. रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होतो आहे. धूळ आणि चिखलामुळे आरोग्यासह शेतकऱ्यांना शेतमालाच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अजिंठा लेण्यांना भेट देणाºया पर्यटकांनी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे येण्याचे टाळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पर्यटकांनी लेण्यांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे जगभर पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश जात आहे. याचा उद्योगवाढीवर देखील परिणाम होतो आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना लगेच फोनद्वारे संपर्क करून कामाला गती देण्याचे आदेश दिले.
शिर्डीकडे जाणाºया रस्त्याचा दर्जा वाढवा
शिर्डी हे देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. औरंगाबाद ते ए.एस. क्लब ते लासूरस्टेशन ते वैजापूर-शिर्डीमार्गे जाणाºया पर्यटक आणि भाविकांची संख्या मोठी आहे; परंतु तो रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा दर्जा वाढवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी खा. धूत यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली.

Web Title: Speed up the work of Aurangabad-Jalgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.