भरधाव हायवाच्या धडकेत एकजण ठार; प्रकरण दडपण्यासाठी राजकीय शक्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 07:10 PM2021-02-27T19:10:50+5:302021-02-27T19:18:22+5:30

जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामावर चालणाऱ्या हायवा चालकांची दादागिरी वाढली

speedy Highway blew both of them; One killed, one seriously injured | भरधाव हायवाच्या धडकेत एकजण ठार; प्रकरण दडपण्यासाठी राजकीय शक्तीचे प्रयत्न

भरधाव हायवाच्या धडकेत एकजण ठार; प्रकरण दडपण्यासाठी राजकीय शक्तीचे प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देहायवा राजकीय पुढाऱ्याचा असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्नरस्त्याची व प्रवाशांची पर्वा न करता ते भरधाव वेगाने हायवा चालवतात

सिल्लोड: तालुक्यातील माणिकनगरजवळ शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामावर खडी वाहतूक करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याच्या हायवाने समोरून येणाऱ्या एका बाईक आणि सायकलस्वारास जोराची धडक दिली.त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. रात्री उशिरा जखमींना उपचाराचा खर्च देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अजूनही या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, जखमीचे जाब जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी लोकमतला दिली.

या अपघातात समाधान भुजंगराव भाकडे (३४, रा. आमखेड़ा ता. चिखली जि. बुलढाणा ह. मु. औरंगाबाद ) यांचा मृत्यू झाला. तर गजानन भिमराव शेळके (३०, रा. भवन) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण समाधान भाकडे दुचाकीवरुण क्रं (एमएच- २०, सिएन- ७३४८) फत्तेपूर येथून नातेवाईकाचे लग्न आटपून औरंगाबादला जात होता. तर जखमी गजानन शेळके भवनहून सायकलवर  हॉटेल शिवनेरीजवळील आपल्या घरी जात होता. या दरम्यान खडीने भरलेला हायवा क्रं. (एमएच- २०, ईएल- २१५१) सिल्लोडकडे जात होता. हायवाने आधी सायकलस्वाराला जोराची धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या बाईकस्वारास जोराची धडक देऊन  हायवा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. दोघांवर प्राथमिक उपचारकरून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवले. यात समाधान भाकडेचा उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. तर गजानन शेळके यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

फक्त अपघाताचा गुन्हा दाखल....
एका हायवाने रात्री एका मोटार सायकल स्वारास व सायकल स्वारास चिरडले असले तरी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात केवळ अपघात दाखल आहे.कुणी तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. जखमी व्यक्तीचा जबाब घेऊन रविवारी या प्रकरणी हायवा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे, बिट अंमलदार पवार यांनी दिली.

राजकीय पुढाऱ्याचा हायवा...
सादर हायवा जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा असल्याने हे प्रकरण रात्री दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.अपघात होताच जखमींना औरंगाबाद येथे पाठवून खर्च भरून देण्याचे सांगण्यात आले. त्या नंतर लगेच जेसीबीच्या सहाय्याने हायवा रोड वरून काढून गुप्त ठिकाणी जमा करण्यात आला. मात्र त्यात एकाचा मृत्यू झाल्याने आता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.

भरधाव वेगाने चालतात हायवा..
जळगाव औरंगाबाद रस्त्याचे काम सुरू आहे त्यावर खडी मुरूम वाहणारे हायवा प्रवाशांसाठी डोके दुःखी बनले आहेत. रस्त्याची व प्रवाशांची पर्वा न करता ते भरधाव वेगाने हायवा चालवतात त्यांच्यावर कार्यवाही करून चालकांना समज द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: speedy Highway blew both of them; One killed, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.