भौतिक सुविधांऐवजी पुस्तकांवर खर्च करा
By Admin | Published: March 11, 2017 12:08 AM2017-03-11T00:08:35+5:302017-03-11T00:09:39+5:30
बीड : शालेय अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा यामुळे ते वाचनापासून दुरावत चालले आहेत.
बीड : शालेय अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा यामुळे ते वाचनापासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे त्यांचा कल ओळखून तशी पुस्तके त्यांना उपलब्ध करून द्यावीत. भौतिक सुखांपेक्षा पुस्तकांवर खर्च करा, असे आवाहन साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष महावीर जोंधळे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व केएसके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पहिल्या जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारत सासणे, दत्ता सराफ, डॉ. वसंत काळपांडे, नीलेश राऊत, अभिजीत जोंधळे, नरेंद्र काळे, डॉ. संदीप शिसोदे यांची उपस्थिती होती. स्वागताध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी महावीर जोंधळे म्हणाले, विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडविण्यासाठी लेखकांनी प्रयोगशील होणे आवश्यक आहे. बालकांचे कल्पनाविश्व जेवढे चमत्कारिक तेवढेच ते उत्तुंग व अनाकलनीय असते. त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना लक्षात घेऊन लिखाण केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी साहित्यिामुळे मराठी साहित्य मागे पडत असल्याची खंत भारत सासणे यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली. ग्रंथाचे स्टॉल लागले होते. (प्रतिनिधी)