स्पाईस जेट, इंडिगो एअरलाईन्सकडून नव्या विमानसेवेचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:24 PM2019-06-11T22:24:33+5:302019-06-11T22:25:02+5:30

औरंगाबाद : देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसायवाढीसाठी औरंगाबादहून नवीन विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे ...

 SpiceJet, Indigo Airlines signs new airline services | स्पाईस जेट, इंडिगो एअरलाईन्सकडून नव्या विमानसेवेचे संकेत

स्पाईस जेट, इंडिगो एअरलाईन्सकडून नव्या विमानसेवेचे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देशिष्टमंडळाने घेतली भेट : नव्या विमानसेवेसाठी सकारात्मक प्रतिसाद, करणार चाचपणी


औरंगाबाद : देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसायवाढीसाठी औरंगाबादहून नवीन विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी दिल्ली दाखल झाले. पहिल्या दिवशी या शिष्टमंडळाची बैठक स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सच्या व्यवस्थापकीय समितीसोबत झाली. यावेळी दोन्ही विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून नव्या विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी दोन्ही विमान कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना औरंगाबादमधून मुंबई, दिल्ली, राजस्थान, गोवा, हैदराबाद आणि बंगळुरू ही महत्त्वाची शहरे जोडण्यात यावीत, ही मागणी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने औरंगाबादची बाजारपेठ, पर्यटन, उद्योग आणि संस्कृतीचीही माहिती दिली. या शिष्टमंडळामध्ये हॉटेल उद्योजक सुनित कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, ‘सीएमआयए‘चे अध्यक्ष राम भोगले, सचिव नितीन गुप्ता, इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार यांचा समावेश आहे.
या चर्चेत स्पाईस जेटच्या पाच अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने सांगितले की, मागील वर्षी आम्ही औरंगाबादमध्ये नव्या विमानसेवेसाठी चाचपणी केली होती. मात्र, तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये बराच बदल झालेला दिसतो. औरंगाबादमधून व्यवसायवृद्धी होणार असेल तर येत्या पंधरा ते वीस दिवसांत स्पाईस जेटचे एक शिष्टमंडळ येऊन चाचपणी क रणार आहे. या चाचपणीत सकारात्मक प्रतिसाद आल्यास औरंगाबादेतून नवी विमानसेवा नक्कीच सुरू करू, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद प्राधान्यक्रमात
इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाºयांनी सांगितले की, औरंगाबाद शहराचे नाव आमच्या प्राधान्यक्रमामध्ये आहे. त्याशिवाय याठिकाणाहून भोपाळ, राजस्थान, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीसाठी नवीन विमाने सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेट एअरवेजचा कमी झालेला स्लॉट भरून काढण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्याशिवाय विमानसेवा सुरू करताना विकलीऐवजी डेलीला प्राधान्य राहील, असेही अधिकाºयांनी शिष्टमंडळाला सांगितले.
 

Web Title:  SpiceJet, Indigo Airlines signs new airline services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.