मन स्वच्छतेसाठी अध्यात्म हाच मार्ग : चाकूरकर
By Admin | Published: August 26, 2016 12:34 AM2016-08-26T00:34:25+5:302016-08-26T00:45:25+5:30
अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल,
अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे गुरुवारी व्यक्त केले.
प.पू.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ८० व्या श्रावणमास तपोअनुष्ठान व मौनमुक्ती सांगता सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, खा.डॉ. सुनील गायकवाड, हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आमदार बसवराज पाटील मुरुमकर, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार रामराव वडकुते, गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, अशोक केंद्रे, भारत चामे, सय्यद साजिद, सांब महाजन, दिलीपराव देशमुख, अभय मिरकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.