घाटीत महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:02 AM2021-07-07T04:02:06+5:302021-07-07T04:02:06+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात सोमवारी आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरास नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात सोमवारी आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरास नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले. याप्रसंगी उपअधिष्ठाता डाॅ. भारत सोनवणे, डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, सुपर स्पेशालिटी ब्लाॅकचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय उपधीक्षक डाॅ. विकास राठोड, डाॅ. अविनाश लांब, डाॅ. अंजली पवार, पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिनगारे, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव देवानंद वानखेडे, सहसचिव डाॅ. अनिल पांडे, जिल्हाध्यक्ष विलास जगताप, सिमा जगताप, सरपंच सिकंदर पहेलवान, अमर राजपूत, पूजा जगताप, दिलीप गोधणे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
शिबिरासाठी महासंघाचे शहराध्यक्ष प्रेमनाथ सातपुते, नितीन राजेगावकर, अब्दुल शफी बेग, राजेश लाहोट, प्रितेश गायकवाड, अमोल जगताप, मिलिंद दाभाडे, योगेश गंगावणे, विभागीय रक्तपेढीतर्फे डाॅ. सिम्मी मिंज, डाॅ. कश्मीरा अग्रवाल, सुनीता बनकर, परिचारिका कुंदा पानसरे, पूजा जांगीर, मनोज पंडित, अविनाश देहाडे, हामास हाजीक आदींनी परिश्रम घेतले.
---
यांनी केले रक्तदान
घाटीतील शिबिरात प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सरोज मसलगे पाटील, शहर काँग्रेसचे सरचिटणीस योगेश मसलगे पाटील, योगेश गंगावणे, श्रीकांत आढाव, शैलेश झालटे, विशांत बागुल, सतीश प्रधान, कुंदन राजपूत, आकाश ठोंबरे, प्रीतम हाटबला, सोमनाथ थोरात, किरण शिरसाठ, कुणाल पाटील, करण माने, नारायण खरात, रईस इनामदार, रुपम लाहोट, रोहन राऊत, ऋषिकेश महालकर, दिनेश सिंग, शेख साेहेल शेख वहाब, सखाराम सावळे, रोहीत रत्नपारखे, जयंत बागूल, संजय निकम, अखिल बेग, सिकंदर इनामदार, रवी गांगवे, संदीप ढेपे, सय्यद शेख, रशीद खान, सुमीत घोरपडे, राजेंद्र जगताप, प्रवीण आहारे, विशाल सरदार, रवी गायकवाड, सचिन कांबळे, सिकंदर इनामदार, संदीप ढेपे, शेख शहानवाज, आकाश नरवडे, प्रकाश मोरे, अमोल थोरात, प्रवीण शेनकारे, विक्रांत पांचुदे, सोनू पाईकडे, योगेश खंडारे, समर्थ वानखेडे, अक्षय बनकर, सुजित वानखेडे, कमल सूर्यवंशी, अब्दुल शफी बेग, आकाश राऊत, नागेश जावळे, अमोल शेजूळ, सय्यद तौसिफ सय्यद मुस्ताक, आतिश पाटणी, पुरुषोत्तम जटावाले, आकाश शेजूळ यांनी रक्तदान केले.