वाळूजमध्ये मसिआच्या योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:04 AM2021-06-23T04:04:21+5:302021-06-23T04:04:21+5:30
शिबिरात आयकर विभागाचे अधिकारी प्रवीण पांडे यांनी उद्योजकांना निरोगी आयुष्यासाठी योग, प्राणायाम करण्याचा सल्ला देत वेगवेगळ्या प्रकाराचे योगासनांचे प्रात्यक्षिक ...
शिबिरात आयकर विभागाचे अधिकारी प्रवीण पांडे यांनी उद्योजकांना निरोगी आयुष्यासाठी योग, प्राणायाम करण्याचा सल्ला देत वेगवेगळ्या प्रकाराचे योगासनांचे प्रात्यक्षिक दाखविले. सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून, धावपळीच्या काळात ताणतणाव कमी करण्यासाठी उद्योजकांनी नियमितपणे योग व प्राणायाम करण्याची गरज असल्याचे पांडे यांनी सांगितले. या योग शिबिरात उद्योगनगरीतील जवळपास ३५ उद्योजकांनी सहभाग घेतला. याच बरोबर ऑनलाईन पद्धतीने काही उद्योजकांनी शिबिरात सहभागी होत योगा व प्राणायामाचे धडे घेतले. कार्यक्रमाला मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, उपाध्यक्ष अनिल पाटील, किरण जगताप, सचिव गजानन देशमुख, कमलाकर पाटील, प्रसिध्दी प्रमुख राहुल मोगले, उद्योग संवादचे संपादक राजेश मानधनी, सुदीप आडतिया, अभिेष मोदाणी, श्रीराम शिंदे, मनीष अग्रवाल, अर्जुन गायकवाड, सर्जेराव साळुंके, दिलीप चौधरी आदीसह मसिआचे पदाधिकारी व उद्योजकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी केले.
फोटो ओळ
वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित शिबिरात उद्योजकांना योग व प्राणायामाबाबत मार्गदर्शन करताना आयकर विभागाचे अधिकारी प्रवीण पांडे.