‘आयएमए’तर्फे स्पोर्ट्स कार्निव्हल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:02 AM2021-01-19T04:02:16+5:302021-01-19T04:02:16+5:30
यात बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, धावणे, सायकलिंग, क्रिकेट, आदी स्पर्धा होणार आहेत. डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. शिरीष ...
यात बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, धावणे, सायकलिंग, क्रिकेट, आदी स्पर्धा होणार आहेत. डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. रमणी आणि डॉ. शोएब हाशमी यांनी मार्गदर्शन केले. या कार्निव्हलसाठी स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. प्रफ्फुल जटाळे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. अक्षय मरावर, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अमृत महाजन, डॉ. अविनाश त्रिभुवन, डॉ. सुरेश रावते, डॉ. धनंजय खटावकर, डॉ. अमित नघते, डॉ. अतुल पोरे, आदी प्रयत्न करीत आहे.
घाटीत ऑक्सिजनच्या स्थितीवर करडी नजर
औरंगाबाद : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे घाटी रुग्णालयात ऑक्सिजनच्या परिस्थितीवर करडी नजर ठेवली जात आहे. मेडीसिन विभाग, सुपर स्पेशालिटी ब्लॉक येथील ऑक्सिजन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तंत्रज्ञ आहेत. त्यांच्याकडून दररोज राऊंड घेतला जातो. काहीही आढळले, तर तत्काळ दुरुस्ती केली जाते. आवश्यक ती खबरदारी घेतली जाते, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
रेल्वेस्टेशनवरील नव्या दादऱ्याचे काम कासवगतीने
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर नवीन दादरा तयार करण्यात येत आहे; परंतु त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. या दादऱ्यामुळे प्रवाशांना थेट रेल्वेस्टेशनबाहेर पडता येणार आहे. आजघडीला केवळ लोखंडी पाया तयार झाला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
‘सुपर स्पेशालिटी’चा तयार होणार आराखडा
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या हस्तांतरासाठी लवकरच अंतिम आराखडा (ड्राफ्ट) तयार करण्यात येणार आहे. सध्या हस्तांतरापूर्वी आवश्यक असलेली इमारतीतील देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर इमारतीचे हस्तांतर होईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
स्नेहनगरमध्ये विद्युत वाहिन्या लाेंबळकत
औरंगाबाद : स्नेहनगर येथे जागोजागी विद्युत वाहिन्या, केबल लोंबळकत आहे. विद्युत डीपीला संरक्षण भिंत, जाळीही नाही. याविषयी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरातील पथदिव्यांचीही दुरवस्था झालेली आहे. या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.