क्रीडा खात्याचा ‘बँड’बाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:47 AM2017-11-16T00:47:35+5:302017-11-16T00:47:42+5:30

लातूर : राज्याचे क्रीडा खाते कधी कोणत्या खेळाच्या स्पर्धा घेईल, याचा नेम नाही. नवीन खेळांच्या स्पर्धांना यंदाच्या वर्षात स्थगिती दिल्याने क्रीडाधिकाºयांना थोडी उसंत मिळाली व आॅलिम्पिक खेळांना चालनाही मिळेल, असे वाटले होते. याउलट आता शालेय बँड स्पर्धेचे आयोजन करण्याचा फतवा नुकताच राज्य शासनाने काढला असून, याची क्रीडा क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

 Sports Department's 'Band' | क्रीडा खात्याचा ‘बँड’बाजा

क्रीडा खात्याचा ‘बँड’बाजा

googlenewsNext

महेश पाळणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राज्याचे क्रीडा खाते कधी कोणत्या खेळाच्या स्पर्धा घेईल, याचा नेम नाही. नवीन खेळांच्या स्पर्धांना यंदाच्या वर्षात स्थगिती दिल्याने क्रीडाधिकाºयांना थोडी उसंत मिळाली व आॅलिम्पिक खेळांना चालनाही मिळेल, असे वाटले होते. याउलट आता शालेय बँड स्पर्धेचे आयोजन करण्याचा फतवा नुकताच राज्य शासनाने काढला असून, याची क्रीडा क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने १० नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हा क्रीडाधिकाºयांना राज्यस्तरीय आंतरशालेय बँड स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या स्पर्धा १८ ते १९ नोव्हेंबरदरम्यान औरंगाबादला होणार आहेत. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मुला-मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. सहा राज्यांतील क्षेत्रीय (झोनल) स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य हे समन्वयक राज्य म्हणून काम पाहणार असल्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. या स्पर्धा राज्यस्तर, क्षेत्रीय स्तर व राष्ट्रीय स्तरावर होणार आहेत. मुला-मुलींच्या संघात प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून, एक पुरुष व एक महिला संघ व्यवस्थापक असा जिल्ह्याचा ४२ जणांचा संघ असणार आहे. या नवीन फतव्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अधिकाºयांची चांगलीच गोची झाली आहे. १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राज्य स्पर्धा घेण्यात येणार असून, जिल्हा क्रीडाधिकाºयांनी आपल्या जिल्ह्याचा प्रवेश अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत पाठवायचा आहे. एकंदरित, नव्याने स्थगित केलेल्या यंदाच्या वर्षातील ३९ खेळांना शालेय स्पर्धेत स्थान दिले नव्हते. त्यामुळे या खेळातील खेळाडूंची व संघटकांची नाराजी होती.
शासनाचे धोरण...
विविध स्तरावर घेण्यात येणाºया या बँड स्पर्धेचे धोरण केंद्र शासनाकडून आले आहे. त्यानुसार राज्याच्या आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांना बँड स्पर्धा घेण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे हा स्पर्धा घेण्याचा मानस क्रीडा विभागाचा असल्याचे लातूर क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय महाडिक यांनी सांगितले.
सांस्कृतिक विभागाकडे का नाही स्पर्धा
नवीन खेळांच्या स्पर्धांना स्थगिती दिल्याने आॅलिम्पिक खेळांना न्याय मिळेल, अशी भावना होती. मात्र क्रीडा खात्याने काढलेल्या बँड स्पर्धेच्या आदेशाने सर्वच अचंबित झाले आहेत. नियमाने या स्पर्धा सांस्कृतिक विभागाकडे द्यावयास होत्या. मात्र क्रीडा खात्याला या स्पर्धा देण्याचे कारण समजू शकले नाही, असे क्रीडा शिक्षक लक्ष्मण बेल्लाळे यांनी सांगितले.
वेळ अपुरा...
क्रीडा खात्याला आलेल्या आदेशाने क्रीडा खात्यातील अधिकारीच अचंबित झाले. जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यासाठी वेळ नसल्याने अधिकाºयांना यासाठी नाचावे लागत आहे. त्यातच शालेय स्तरावरही बँड पथक तोकडे आहेत. त्यांनाही सरावासाठी वेळ अपुरा असल्याने या स्पर्धा कशा नाचणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title:  Sports Department's 'Band'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.