सिडको वाळूज महानगर स्टेडियमची क्रीडामंत्र्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:03 AM2021-04-18T04:03:56+5:302021-04-18T04:03:56+5:30
वाळूज महानगर : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शनिवार (दि.१७) सकाळी ...
वाळूज महानगर : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शनिवार (दि.१७) सकाळी सिडको वाळूज महानगर-४ मधील स्टेडियमची पाहणी केली. यानंतर स्टेडियमच्या हस्तांतरणासंदर्भात सिडको प्रशासक व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सिडको प्रशासनाने गोलवाडी शिवारात महानगर-४ मध्ये उद्योन्मुख खेळाडूसाठी स्टेडियम उभारले आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या स्टेडियमला शनिवारी अचानक भेट दिली. या प्रसंगी सिडकोचे प्रशासक भुजंगराव गायकवाड, क्रीडा विभागाच्या विभागीय उपसंचालक उर्मिला मोराळे, सिडकोचे कार्यकारी अभियंता कपील राजपूत, सहायक अभियंता मारोती वावरे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी स्टेडियमचे क्रीडा विभागाकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात सिडकोचे अधिकारी व क्रीडा विभागाच्या उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
फोटो ओळ- सिडको वाळूज महानगर-४ मधील स्टेडियमची पाहणी करतांना क्रीडा मंत्री सुनील केदार. सोबत क्रीडा विभागाच्या विभागीय संचालक उर्मिला मोराळे व इतर दिसत आहेत.
फोटो क्रमांक- पाहणी १/२
----------------