शिष्यवृत्ती घोटाळ्यातील चौकशीचा मांडला ‘खेळ’ !

By Admin | Published: September 1, 2014 12:28 AM2014-09-01T00:28:02+5:302014-09-01T01:09:52+5:30

सोमनाथ खताळ , बीड समाजलकल्याणकडून दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने समोर आणला होता. यावर चौकशी समितीही नेमली होती.

'Sports' in the scholarship scandal! | शिष्यवृत्ती घोटाळ्यातील चौकशीचा मांडला ‘खेळ’ !

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील चौकशीचा मांडला ‘खेळ’ !

googlenewsNext


सोमनाथ खताळ , बीड
समाजलकल्याणकडून दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने समोर आणला होता. यावर चौकशी समितीही नेमली होती. मात्र, ही समिती केवळ नावालाच ठरली. विशेष म्हणजे समाजकल्याण आणि चौकशी समितीच्या अध्यक्षांनी या घोटाळ्याचा खेळ मांडला आहे.
औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त एस.बी.कांबळे यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सात लोकांची समिती नेमली होती. याचे अध्यक्ष जि.प. चे समाजकल्याण अधिकारी एस.एस. शेळके हे आहेत. चौकशी पुढे सरकत नसल्याने कारवाईला विलंब होत आहे. याबाबत समाजकल्याण अधिकारी शेळके म्हणाले, मला चौकशीचे आदेश मिळालेच नाहीत. समाजकल्याचे सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी चौकशीचे आदेश दिले आहेत. समाजकल्याण विभागाच्या टोलवाटोलवींच्या उत्तरामुळे अधिकाऱ्यांचेच घोटाळेबहाद्दर शाळांना अभय असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव यांनी केला आहे.
कांबळे, शिंदे यांची बोलण्यास टाळाटाळ
या शिष्यवृत्ती वाटपातील झालेल्या लाखोंच्या घोटाळ्यातील चौकशी समितीने मांडलेल्या खेळाबद्दल प्रादेशिक उपायुक्त एम.बी.कांबळे आणि सहा.आयुक्त आर.एम.शिंदे यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.
प्रत्येक तालुक्यातील दोन शाळा तपासून त्यांचा अहवाल ३० आॅगस्टपर्यंत समाजकल्याण कार्यालयास कळविणे आवश्यक होते. मात्र शनिवारपर्यंत कुठलाही अहवाल दाखल झाला नव्हता. याबाबत चौकशी समितीचे अध्यक्षांनी आपण प्रशिक्षणात व्यस्त असून भरपूर कामे आहेत, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.

Web Title: 'Sports' in the scholarship scandal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.