स्फोटकांसाठी शरदने केले औरंगाबादेत साहित्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:46 AM2018-08-26T00:46:29+5:302018-08-26T00:46:56+5:30

नालासोपारा येथे स्फोटके बनविण्यासाठी लागणारे गंधक आणि बॅटरी या साहित्याची औरंगाबादेतून खरेदी करण्यात आल्याच्या पावत्या (बिले) या प्रकरणात अटक केलेल्या शरद कळसकर याच्याकडे सापडल्या आहेत. त्यामुळे यासंबंधीची चौकशी करण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक पथकाची एक टीमशहरात मुक्कामाला आहे. या टीमने जुना मोंढा परिसरातील एका दुकानात चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sprint for the explosives and purchase of materials in Aurangabad | स्फोटकांसाठी शरदने केले औरंगाबादेत साहित्य खरेदी

स्फोटकांसाठी शरदने केले औरंगाबादेत साहित्य खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशीसाठी पथक शहरात मुक्कामी : दुकानातील खरेदी-विक्रीची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नालासोपारा येथे स्फोटके बनविण्यासाठी लागणारे गंधक आणि बॅटरी या साहित्याची औरंगाबादेतून खरेदी करण्यात आल्याच्या पावत्या (बिले) या प्रकरणात अटक केलेल्या शरद कळसकर याच्याकडे सापडल्या आहेत. त्यामुळे यासंबंधीची चौकशी करण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक पथकाची एक टीमशहरात मुक्कामाला आहे. या टीमने जुना मोंढा परिसरातील एका दुकानात चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नालासोपारा येथे बेकायदा स्फोटके सापडल्याप्रकरणी दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) वैभव राऊत या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे.
राऊत याची चौकशी केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी गावच्या शरद कळसकरला अटक करण्यात आली.
शरदने स्फोटकांसाठी लागणारे साहित्य औरंगाबादेतून खरेदी केल्याच्या काही पावत्या पथकाने हस्तगत केल्या. शरद कळसकरकडून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी एक पथक औरंगाबादेत दाखल झाले आहे. शरदने औरंगाबाद शहरातून स्फोटके तयार करण्यासाठी किती साहित्य खरेदी केले,याचा शोध पथकद्वारे घेतला जात आहे. शरदने शहरातून बॅटरी व इतर साहित्य खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फोटके तयार करण्यासाठी त्याने आणखी कोणकोणत्या वस्तू औरंगाबादेतून नालासोपाऱ्यात नेल्या आहेत, यादृष्टीने माहिती गोळा केली जात आहे.
मित्रासोबत येऊन केली खरेदी
तीन महिन्यांपूर्वी शरद हा एक मित्रासोबत गाडी घेऊन मुंबईतून शहरात आला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यावेळी स्फोटासाठी लागणाºया साहित्याची त्याने खरेदी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वाहनामध्ये वापरण्यात येणारी बॅटरी व गंधकाची खरेदी करण्याच्या कामात त्याच्यासोबत एक मित्रही असल्याचे समजते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतलेला सचिन अंदुरेदेखील शरदला स्फोटकासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मदतीला होता, अशी कबुली शरद कळसकरने पोलिसांना दिली.
काल्पनिक नावाने खरेदी
औरंगाबादेतील एका दुकानातून ही साहित्य खरेदी केली आहे. मात्र, ही खरेदी शरद कळसकरने काल्पनिक नावाने केली आहे. पावतीच्या आधारे पथकाने खातरजमा करण्यासाठी चौकशी केली असता, सर्व नावे काल्पनिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
ज्या दुकानात साहित्य खरेदी केले त्या दुकानात खरेदीच्या नोंदी जुळतात का, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी पथक शहरातच थांबलेले आहे. पावतीवरील नावाचा ताळमेळ लागत नसल्याचेही समजते. हे साहित्य खरेदी करताना संबंध उघड होऊ नये, याची खबरदारी बाळगल्याचे दिसते.
गौरी लंकेशचा मारेकरी अमोल काळे याचा औरंगाबाद-जालना मुक्काम नेमका कुठे आणि कसा होता. त्यावेळी त्याच्या संपर्कात कोण-कोण आले. त्यादृष्टीनेही कर्नाटकाचे पथक तपासात आहे.

Web Title: Sprint for the explosives and purchase of materials in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.