जोगेश्वरी ग्रामपंचायतीवर सपाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:52 PM2019-01-17T18:52:03+5:302019-01-17T18:52:18+5:30
जोगेश्वरीत नागरी सुविधांसह विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणूण सोडला होता.
वाळूज महानगर : जोगेश्वरीत नागरी सुविधांसह विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणूण सोडला होता. प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीकडून मोर्चेकºयांना देण्यात आले.
गावातील न्यू आंबेडकरनगरातील ड्रेनेजलाईन टाकण्यात यावी, अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण करावे, मुबलक पाणी पुरवठा करावा, स्वच्छता मोहीम राबवावी, अतिक्रमणधारकांना नमुना ८ चे उतारे देऊन मालकी हक्क देण्यात यावे, सुवर्ण महोत्सवी योजनेंतर्गत स्वच्छतागृहाची कामे पूर्ण करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चात सपाचे प्रदेश युवा अध्यक्ष फैसल खान, फैजोद्दीन सिद्दीकी, शफीक बेग, सुरेश सरदार, अरुण पठारे, सय्यद सरवर, गणेश कांबळे, दत्ता गाडेकर, अमोल पवार, रघुनंदन काकडे, दिनेश कांबळे, गायत्रीबाई साळुंके, चंद्रकलाबाई भालेराव, संध्या पवार, कल्पना सुपेकर, उषाबाई सरदार, सागरबाई शेजुळ आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, माजी सरपंच प्रविण दुबिले, अमोल लोहकरे, हरिदास चव्हाण आदींनी मोर्चेकºयांशी चर्चा करुन टप्या-टप्याने प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना दिले.