वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर

By Admin | Published: March 20, 2016 11:51 PM2016-03-20T23:51:52+5:302016-03-21T00:10:00+5:30

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मार्गातील वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर झाला आहे.

Square-2 blockage of land is far away | वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर

वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर

googlenewsNext


संजय तिपाले , बीड
धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगडावर रविवारी पार पडलेल्या नगद नारायण महाराज यांच्या द्विशताब्दीपूर्ती पुण्यतिथी सोहळा व महंत शिवाजी महाराज यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात राजकीय जुगलबंदीने रंगत भरली. आ. विनायक मेटे यांनी चौफेर टोलेबाजी केली, तर माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्या मिश्किल टिपण्णीने हास्याचे कारंजे उसळले.
अध्यात्माच्या या व्यासपीठावर संत-महंतांबरोबरच राजकीय नेत्यांची गर्दी होती. हा दुर्मिळ योग साधून नेत्यांनी संतांपुढे आपले श्रेष्ठत्व दाखवितानाच आशीर्वादाची अपेक्षा केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी आ. राजेंद्र जगताप यांनी मी आमदार असताना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना गडावर आणले होते. त्यांनी गडावरून रायगड दिसतो, असे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार आले.
त्यांनी मुंबई-दिल्ली दिसते, असे म्हटले होते. गडाची भक्ती करणाऱ्यांना नगद नारायण ‘नगद’ प्रसाद देतो. मेटे ताटकळले आहेत. त्यांना नक्कीच ‘आशीर्वाद’ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
खा. रजनी पाटील भाषणात म्हणाल्या, मला गडावरून दुष्काळात होरपळणारा माणूस दिसतो. आ. विनायक मेटे यांनी माजी आ. जगताप यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ‘मला विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला आशीर्वाद दिला असता तर बरे झाले असते, असे सूचक वक्तव्य केले. यावेळी हंशा पिकला.
व्यासपीठावर राकाँचे केवळ जि.प. अध्यक्ष पंडित उपस्थित होते. त्याकडे लक्ष वेधत मेटे यांनी एकमेव विजयसिंह पंडित कार्यक्रमास हजर राहिल्याचा उल्लेख केला. मी व रजनी पाटील केजवरून गडावर येतो; पण गडाच्या जवळ असणारे वळून गडाला साधे पूजत नाहीत, असे सांगून त्यांनी क्षीरसागरांचा नामोल्लेख टाळत शरसंधान केले.
गडावरून कोणाला मुंबई दिसते, तर कोणाला दिल्ली दिसते; पण मला समाज दिसतो, असे सूचक वक्तव्य करून मेटे यांनी नव्या राजकीय समीकरणाची गणिते मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते; परंतु न्यायालयात स्थगिती मिळविण्यासाठी जिल्ह्यातील काही ओबीसी नेत्यांनी खोडा घातला, असा टोलाही त्यांनी लगावला. भगवानगड, गोपीनाथगडावर लोक स्वत:हून येतात. कुणाच्या निमंत्राची गरज पडत नाही. ही श्रद्धा आपल्यात कधी येणार? असा सवाल त्यांनी विचारला. काही तत्त्व, धोरण मी पाळले आहेत, त्यात तडजोड नाही. राजकारण गेलं चुलीत, अशा रांगड्या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रणजित पाटील आले ते बरे झाले. आमचे काय व्हायचे ते होईल; पण मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे प्रमोशन होईल, अशी आशा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.

Web Title: Square-2 blockage of land is far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.