चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक

By मुजीब देवणीकर | Published: December 19, 2023 03:50 PM2023-12-19T15:50:26+5:302023-12-19T15:51:03+5:30

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट आहे. धावपट्टीची लांबी १२ हजार फूट करा, असा प्रस्ताव आहे.

Sri Ganesha of Land Acquisition for Chikalthana Airport; Appointment of Special Land Acquisition Officers from Municipal Corporation | चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळासाठी जागा अपुरी पडत आहे. विमानतळ प्राधिकरण मागील अनेक वर्षांपासून भूसंपादनाची मागणी करीत आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेतील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची ५२ हेक्टर जागा संपादित करण्यासाठी नेमणूक केली. लवकरच चिकलठाणा, मुकुंदवाडी, मूर्तिजापूर भागातील जमिनींचे भूसंपादन होणार आहे. विशेष बाब म्हणजे भूसंपादन करताना पुनर्वसन, पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या अधिनियमाचा वापर करावा, असेही म्हटले आहे.

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट आहे. धावपट्टीची लांबी १२ हजार फूट करा, असा प्रस्ताव आहे. त्यासाठी अतिरिक्त १८२ एकर जागा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जून २०२२ मध्ये भूमी अभिलेख कार्यालय, महसूल विभाग व महापालिकेने दक्षिण बाजूने १४७ एकर जमिनीची संयुक्त मोजणी केली. १३९ एकर जमीन खासगी मालकीची तर ८ एकर जागा सिडको विभागाची आहे. त्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला पाहिजे तशी गती मिळत नव्हती. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेतील विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांची नियुक्ती केली. त्यांना भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

कोणत्या सर्व्हे-गटाचे भूसंपादन?
चिकलठाणा- ३८८,३९६, ३९७, ४५४,३९८,३९९,४५६,४०१,४०२,४१९,४००,४२१,४१६,४१७,४१८,४३१ ते ४३६, ४५२,४५३,५२२,५२५,५२९,५३०,५३१,५३२,५३३/१, ५३५ ते ५३९, ४२२, ४२३,४२४,४२६,७४८.
संपादित करायचे क्षेत्र-४५.९६८४ हेक्टर
मुकुंदवाडी- १३,१५,१६,१७,१८,२१,२२,२६.
संपादित करायचे क्षेत्र-२.४३०३ हेक्टर
मूर्तिजापूर-३४ /२,२९/१, ३०.३१
संपादित करायचे क्षेत्र-४.२५४३ हेक्टर

Web Title: Sri Ganesha of Land Acquisition for Chikalthana Airport; Appointment of Special Land Acquisition Officers from Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.