एसटी महामंडळाची ‘दिवाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:13 PM2018-11-13T22:13:49+5:302018-11-13T22:14:10+5:30
औरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाची खऱ्या अर्थाने यंदा दिवाळी झाली आहे. अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.४८ कोटींनी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.
प्रवासी वाहतूक : १२ दिवसांत ८.८३ कोटींचे उत्पन्न
औरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाची खऱ्या अर्थाने यंदा दिवाळी झाली आहे. अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.४८ कोटींनी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.
गतवर्षी ऐन दिवाळीत एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे गतवर्षी उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र दिवाळीतील प्रवासी वाहतुकीने ‘एसटी’च्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. गतवर्षी ६ कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न विभागाला प्राप्त झाले होते, तर २२ लाख ९६ हजार कि.मी. अंतर प्रवासी वाहतुकीची नोंद झाली होती.
यंदा ८ कोटी ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, तर २५ लाख २१ कि.मी. अंतर प्रवासी वाहतूक झाली. त्यामुळे उत्पन्नात यंदा चांगलीच वाढ झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. एकट्या पुणे मार्गावर रविवारी ६० पेक्षा अधिक बस धावल्या. जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकातून विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या. शिवाय ऐन दिवाळीत महामंडळाने भाड्यात वाढ केली होती.