सेंट जोन्स, एमपीएसची प्रतिस्पर्धी संघांवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:29 AM2018-01-09T00:29:18+5:302018-01-09T00:29:45+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या गादिया करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एमपीएस आणि सेंट जोन्स संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

St. Jones, MPS compete against the rival teams | सेंट जोन्स, एमपीएसची प्रतिस्पर्धी संघांवर मात

सेंट जोन्स, एमपीएसची प्रतिस्पर्धी संघांवर मात

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या गादिया करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एमपीएस आणि सेंट जोन्स संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. पहिल्या सामन्यात महेशनगर येथील एमपीएसने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १०४ धावा केल्या. त्यांच्याकडून आदित्य पाटीलने १५ धवा केल्या. केम्ब्रिजकडून प्रणव बेलापूरकरने ३ व भुवन झांबडने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात केम्ब्रिज संघ ६ बाद ९९ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून संकेत पाटीलने २५ व साहील धूतने १५ धावा केल्या. एमपीएसकडून विशाल कोटकर, तनुज सोळुंके व प्रतीक ब्रह्मपूरकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात महाराष्ट्र पब्लिक स्कूलने एमजीएमविरुद्ध १५ षटकांत ६ बाद १२३ धावा केल्या. त्यांच्याकडून शशिकांत भडगळे याने नाबाद ४४ व अक्षय मेहेत्रे याने १५ व कौशल कांबळेने १९ धावा केल्या. प्रत्युत्तरात एमजीएमचा संघ ६ बाद १०८ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून चैतन्य शिरसाठने नाबाद २५ व मयूर गवळी व प्रतीक चव्हाण यांनी प्रत्येकी १९ धावा केल्या. शशिकांत भडगळे याने १७ धावांत ४ गडी बाद केले. तिसºया सामन्यात सेंट जोन्सने १५ षटकांत ८ बाद १०५ धावा केल्या. त्यांच्याकडून रितेश लदवानियाने नाबाद २९ व आकाश चव्हाण याने नाबाद १५ धावा केल्या. ए. के. पटेल संघाकडून विशाल सोनवणे याने १२ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए. के. पटेल संघ १३.२ षटकांत ६८ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून विशाल सोनवणे व शेख झैद यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. सेंट जोन्सकडून रोहन मुळे व आकाश चव्हाण यांनी प्रत्येकी ३, तर अजय पांचालने २ गडी बाद केले.

Web Title: St. Jones, MPS compete against the rival teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.