ST Strike : संपामुळे सोयगाव आगाराचे अजिंठा लेणीतून मिळणारे ४४ लाखांचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 04:29 PM2021-12-01T16:29:35+5:302021-12-01T16:30:16+5:30
ST Strike: सध्या एकूण १७ खाजगी वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीमध्ये उपलब्ध आहेत.
सोयगाव ( औरंगाबाद ) : मागील २२ दिवसांपासून एसटी महामंडळाचे कर्मचाऱी संपावर गेल्याने अजिंठा लेणीची बस सेवा बंद आहे. यामुळे महामंडळाचा जवळपास ४४ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. पर्यटकांचे हाल होत असल्याने सध्या खाजगी वाहनांना परवानगी देऊन पर्यटकांना सेवा देणे सध्या सुरू आहे.
राज्य सकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात सोयगाव आगाराचे कर्मचारी सहभागी झाल्याने दि.९ नोव्हेंबरपासून अजिंठा लेणीची बससेवा बंद पडली आहे. यामुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत. पर्यकांना बैल गाडी किंवा चालत लेणीपर्यंत जावे लागे. यामुळे पर्यटन विकास महामंडळाच्या मागणी वरून दि.११.नोव्हेंबरला १० खाजगी वाहनांना पर्यटकांना नेआण करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु ही वाहेन कमी पडत असल्याने दि.१५. नोव्हेंबरला ४ तर दि.३० नोव्हेंबरला आणखी ३ खाजगी वाहनांना परवानगी देण्यात आली.
आता एकूण १७ खाजगी वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, लेणीत बस सेवा बंद असल्याने सोयगाव आगाराला मिळणारा २२ दिवसातील तब्बल ४४ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. दरम्यान, लवकरच लेणीतील बस सेवा सुरळीत सुरू होण्याचे संकेत सोयगाव आगार प्रमुख एच.जे.ठाकरे यांनी दिले आहेत.