औरंगाबादेत 'एसटी'ची वाहतूक विस्कळीत,उपोषणात कर्मचाऱ्यांचा वाढला सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 09:25 AM2021-10-28T09:25:08+5:302021-10-28T09:30:33+5:30

ST Bus Employee Hunger Strike : आगारातून एकही बस बाहेर पडणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

ST traffic disrupted in Aurangabad, increased participation of employees in hunger strike | औरंगाबादेत 'एसटी'ची वाहतूक विस्कळीत,उपोषणात कर्मचाऱ्यांचा वाढला सहभाग

औरंगाबादेत 'एसटी'ची वाहतूक विस्कळीत,उपोषणात कर्मचाऱ्यांचा वाढला सहभाग

googlenewsNext

औरंगाबादएसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी  बुधवारपासून बेमुदत उपोषण ( ST Bus Employee Hunger Strike ) सुरू केले आहे. या उपोषणात दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहर बसही ठप्प झाली आहे. 

चिकलठाणा येथील आगाराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र जमले आहेत. आगारातून एकही बस बाहेर पडणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सकाळपासून केवळ तीनच बस आगारातून रवाना झाल्या आहेत. सिडको बसस्थानकातून सध्या केवळ मुक्कामी आलेल्या बस रवाना करण्यास प्राधान्य दिल्या जात आहे.

Web Title: ST traffic disrupted in Aurangabad, increased participation of employees in hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.