एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:02 AM2021-07-23T04:02:02+5:302021-07-23T04:02:02+5:30

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक ...

ST travel safe; So why travels? | एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

googlenewsNext

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतो. पण वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांकडून ट्र्रॅव्हल्सला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात एसटी चालक व वाहक अधिक प्रमाणात बाधित झाले होते. त्यामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करून एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. त्यातही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाइन अर्ज टाकून परवानगी मिळाल्यानंतरच प्रवास करता येत होता. परंतु त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आदळआपट, खडखड टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्याकरिता प्रवाशांनी खाजगी वाहनांना अधिक पसंती दिलेली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित असला तरी प्रवासी खाजगी प्रवासी वाहनांनी ओढलेले आहेत. प्रवाशांना लागणाऱ्या सेवा-सुविधा खाजगी प्रवासी वाहनांमध्ये पुरविलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आराम गाडीत आराम करीत जातात. प्रवासातून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटू नये म्हणून खबरदारी घेतलेली असते.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल सुसाट...

अपघाताच्या घटना घडामोडी होऊ नये म्हणून एसटी बसला स्पीड लॉक केले जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो. खाजगी प्रवासी बसला सुसाट वेग असतो त्यामुळे प्रवासी ठरलेल्या वेळेत पुणे, मुंबईमध्ये पोहोचतो. खाजगी बसला मात्र लाॅक लावलेले नसते.

आराम महत्त्वाचा की, सुरक्षित प्रवास....

- नोकरदारांना गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा खाजगी बसेसने प्रवास सोयीचा ठरतो. अनेकदा उशिरा पोहोचल्यामुळे कामाला सुट्टी मारावी लागते.

- अनिल भालेराव (प्रवासी)

- सामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवास करण्यासाठी आजही भीती वाटते. परंतु नोकरी व शैक्षणिक कारणासाठी प्रवास हा गरजेचा आहे. महत्त्वाची कामे असल्यामुळे प्रवासात जास्त बसेस बदलण्याची गरज पडत आहे म्हणून खाजगी बसने प्रवास करतो.

- अशोक गडवे (प्रवासी)

सर्वांनाच सुरक्षित एसटी आवडते...

खाजगी बससेवेची वाहतूक होत असली तरी सुरक्षित प्रवास म्हणून आजही लोक एसटी लाच प्राधान्य देतात. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वेगमर्यादा असल्यामुळे वाहतूक सुरक्षित असते.

- अमोल आहिरे, एसटीचे विभागीय अधिकारी

Web Title: ST travel safe; So why travels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.