एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट! (स्टार १२१२)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:02 AM2021-09-23T04:02:11+5:302021-09-23T04:02:11+5:30
औरंगाबाद : कोरोनामुळे सारं जग कसं अंधारल्यागत झालं होतं. आता हळूहळू का होईना जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोनाकाळात एसटीची ...
औरंगाबाद : कोरोनामुळे सारं जग कसं अंधारल्यागत झालं होतं. आता हळूहळू का होईना जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोनाकाळात एसटीची थांबलेली चाकं आता धावू लागली आहेत. ५० टक्के क्षमतेने कोटिंग करण्यात आलेल्या कोरोना फ्री गाड्या आता मजल दरमजल करीत धावत आहेत. अनेक गाड्या औरंगाबादहून परराज्यातील मोठमोठ्या शहरांसाठी सुरु झालेल्या आहेत.
..........................................................
परराज्यात जाणाऱ्या बस....
औरंगाबाद- गुलबर्गा
औरंगाबाद- अहमदाबाद
औरंगाबाद- सूरत
औरंगाबाद- बऱ्हाणपूर
........................
सध्या औरंगाबाद - इंदूर गाडी अद्याप सुरु झाली नाही. इंदूर व विजापूरसाठी लवकरच गाड्या सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अव्हरेज गर्दी......
औरंगाबादहून परराज्यात जाणाऱ्या गाड्यांमध्ये सध्यातरी गर्दी नाही. अव्हरेज गर्दी असते.
....................................................
१०० टक्के वाहक- चालकांचे लसीकरण पूर्ण
औरंगाबाद जिल्ह्यातील वाहक-चालकांची संख्या २३०० इतकी आहे. या सर्वांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शिबिरे भरवून लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. बहुतांश वाहनचालकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
.................
कर्नाटकात होते तपासणी .....
आता शक्यतो सारेच वाहनचालक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. शिवाय प्रवाशांसह त्यांनाही मास्क सक्तीचे आहेच. कर्नाटक व मध्य प्रदेशातच मोजक्या बस सुरु आहेत. कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आताही तपासणी केली जाते.
- अमोल अहिरे, वाहतूक अधिकारी, औरंगाबाद.
....................................................................