ग्रामीण जीवनवाहिनी तिस-या दिवशीही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:34 AM2017-10-20T00:34:16+5:302017-10-20T00:34:16+5:30

एसटी बससेवा गुरुवारी (दि.१९) सलग तिस-या दिवशीही ठप्प राहिली.

ST workers strike continues | ग्रामीण जीवनवाहिनी तिस-या दिवशीही ठप्प

ग्रामीण जीवनवाहिनी तिस-या दिवशीही ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी बससेवा गुरुवारी (दि.१९) सलग तिस-या दिवशीही ठप्प राहिली. मध्यवर्ती बसस्थानकात संपकरी एसटी कर्मचाºयांनी काळ्या रंगाचा आकाशकंदिल आणि काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. सगळीकडे रोषणाई असताना एसटी प्रशासन आणि राज्य सरकारच्या भूमिकेमुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याची भावना कर्मचा-यांनी व्यक्त केली.
एसटी महामंडळातील कर्मचाºयांना तब्बल तिस-या दिवशीही मागण्यांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा करावी लागली. सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग देण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील पाचशे बसपैकी एकही बस तीन दिवसांपासून रस्त्यावर आलेली नाही. संपामुळे एसटी महामंडळाचे दोन कोटींवर उत्पन्न बुडाले.
मध्यवर्ती बसस्थानकात एसटी कर्मचा-यांनी काळ्या रंगाचा आकाशकंदिल आणि काळ्या रंगाच्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी कर्मचा-यांनी जोरदार निदर्शने केली. प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे राज्य संघटक सचिव सुरेश जाधव म्हणाले.

Web Title: ST workers strike continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.