तिरुपतीच्या रांगेत उभा राहिले, पास बनावट निघाल्याने ६१ जण दर्शनाविना परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 07:41 PM2021-10-12T19:41:20+5:302021-10-12T19:43:12+5:30

Crime in Aurangabad : औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिसांची कारवाई

Standing in the queue of Tirupati, 61 people returned without darshan due to fake pass | तिरुपतीच्या रांगेत उभा राहिले, पास बनावट निघाल्याने ६१ जण दर्शनाविना परतले

तिरुपतीच्या रांगेत उभा राहिले, पास बनावट निघाल्याने ६१ जण दर्शनाविना परतले

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या 

औरंगाबाद : तिरुपती बालाजी देवस्थानचे ( tirupati balaji mandir) बनावट पास देऊन ६१ जणांची ( fake pass of Tirupati Mandir ) फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिसांनी गारखेडा परिसरातील आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याने बनावट पास देऊन फसवणूक केल्याची कबुली दिल्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी सांगितले.

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील गणेश चौधरी व त्यांच्या सोबत ६० जणांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन आशिष नारायण गुणाले (वय २२, रा. गजानननगर,गारखेडा) याने तिरुपती देवस्थानचे पास दिले होते. या पासनुसार ६१ जण १७ सप्टेंबर २०२१ रोजी तिरुपती बालाजी याठिकाणी पोहोचले. दर्शन रांगेत उभे राहिले असताना तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी पासची तपासणी केली. तेव्हा ते पास बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वांनाच दर्शन रांगेतून बाहेर काढण्यात आले. ६१ जणांना दर्शनाविनाच परत यावे लागले. या फसवणुकीची तक्रार गणेश चौधरी यांनी औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सायबर पोलिसांनी बारकाईने तांत्रिक पद्धतीने तपास करून बनावट पास देणारा आरोपी आशिष गुणाले याला अटक केली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या समोर पुरावे सादर केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने गुन्ह्यात वापरलेले संगणक, कलर प्रिंटर, स्कॅनर आणि मोबाइल असे साहित्य सायबर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रवींद्र निकाळजे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार रवींद्र लोखंडे, कैलास कामठे, संदीप वरपे, दत्ता तरटे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाये, लखन पाचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले आदींच्या पथकाने केली.

Web Title: Standing in the queue of Tirupati, 61 people returned without darshan due to fake pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.