स्टार क्रिकेटर केदार जाधव एपीएलमध्ये खेळणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:31 PM2023-01-31T13:31:53+5:302023-01-31T13:32:11+5:30

एपीएलच्या दहाव्या पर्वात २५ लाखांपर्यंत पारितोषिके

Star cricketer Kedar Jadhav to play in Lokmat APL, know complete schedule of series | स्टार क्रिकेटर केदार जाधव एपीएलमध्ये खेळणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

स्टार क्रिकेटर केदार जाधव एपीएलमध्ये खेळणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

googlenewsNext

औरंगाबाद : लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या लोकमत औरंगाबाद क्रिकेट प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वात भारतीय स्टार क्रिकेटपटू केदार जाधव हा असीफ पटेल यांच्या किंग वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. गरवारे स्टेडियमवर उद्या, मंगळवारी किंग वॉरियर्स संघाचा सामना दुपारी १.३० वाजता भवानी टायगर्स संघाविरुद्ध रंगणार आहे.

केदार जाधव याने भारताकडून ७३ वनडे सामने खेळताना १ हजार ३८९ धावा केल्या आहेत. तसेच ९ टी-२० सामने खेळले आहेत. तसेच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळला आहे. नुकत्याच रणजी करंडक स्पर्धेत त्याने मुंबईविरुद्ध १२८ आणि आसामविरुद्ध २८३ धावांची खेळी केली होती.

एपीएलच्या १०व्या पर्वाचे वेळापत्रक
३० जानेवारी : 
- राव रॉयल्स विरुद्ध गुड्डू इएमआय २१, वेळ : दुपारी ३.३० वा.
- मनजीत प्राइड वर्ल्ड विरूद्ध ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड, वेळ : रात्री ७:४५ मि.

३१ जानेवारी: 
- भवानी टायगर्स विरूद्ध पटेल किंग वॉरियर्स, वेळ : दुपारी २:३० वा.
- मनजित प्राइड वि. शक्ती स्ट्रायकर्स, वेळ : सायंकाळी ५:०० वा.
- राव रॉयल्स विरूद्ध कराड हॉक्स, वेळ : रात्री ७:४५ वा.

१ फेब्रुवारी: 
- शक्ती स्ट्रायकर्स विरूद्ध जेन्युएन रॉयल्स, वेळ : दुपारी १२:०० वा.
- मनजीत प्राइड वर्ल्ड वि. शिंदे रायझिंग किंग्ज, वेळ दुपारी २:३० वा.
- भवानी टायगर्स विरूद्ध राव रॉयल्स, वेळ : सायंकाळी ५:०० वा.
- पटेल किंग वॉरियर्स वि. गुड्डू इएमआय २१, वेळ : ७:४५ वा.

२ फेब्रुवारी: 
- कराड हॉक्स वि. गुड्डू इएमआय २१, वेळ : दुपारी १२:०० वा.
- शक्ती स्ट्रायकर्स वि. शिंदे रायझिंग किंग्ज, वेळ : दुपारी २:३० वा.
- ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड वि. जेन्युएन रॉयल्स, वेळ : दुपारी ५:०० वा.
- भवानी टायगर्स वि. कराड हॉक्स, वेळ : रात्री ७:४५ वा.

३ फेब्रुवारी: 
- शिंदे रायझिंग किंग्ज वि. जेन्युएन रॉयल्स, वेळ : दुपारी १२:०० वा.
- राव रॉयल्स वि. पटेल किंग वॉरियर्स, दुपारी २:३० वा.
- ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड वि. शक्ती स्ट्रायकर्स, वेळ : सायंकाळी ५ वा.
- भवानी टायगर्स वि. गुड्डू इएमआय २१, वेळ : सायंकाळी ७:४५ वा.

४ फेब्रुवारी: 
- शिंदे रायझिंग किंग्ज वि. ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड, वेळ : दुपारी २:३० वा.
- पटेल किंग वॉरियर्स वि. कराड हॉक्स, वेळ : सायंकाळी ५:०० वा.
- जेन्युएन रॉयल्स वि. मनजित प्राइड वर्ल्ड, सायंकाळी ७:४५ वा.

५ फेब्रुवारी: 
- पहिली उपांत्य फेरीची लढत : (ए १ विरूद्ध बी २), वेळ : ५:०० वा.
दुसरी उपांत्य फेरीची लढत : (बी १ विरूद्ध ए २)

६ फेब्रुवारी : अंतिम सामना, वेळ : सायंकाळी ७:४५ वा.

एपीएलच्या दहाव्या पर्वात २५ लाखांपर्यंत पारितोषिके
सोमवारपासून सुरू होणाऱ्या एपीएलच्या दहाव्या पर्वात खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. जवळपास २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळविण्याची संधी खेळाडूंना असणार आहे. त्यामुळे खेळाडू मालामाल होणार आहेत.

पुरस्कारप्राप्त खेळाडूंना मिळणार आयफोन
१० संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत मित्तल इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मालिकावीर, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि ‘बेस्ट आऊटसाइडर प्लेअर’ यांच्यासाठी प्रत्येकी एक आयफोन बक्षीसरूपाने देण्यात येणार आहे. या चार आयफोनची एकूण किंमत तब्बल २ लाख ८० हजार असणार आहे.

विजेत्यात २ तर उपविजेत्यास १ लाखाचे बक्षीस
एपीएल स्पर्धेतील चॅम्पियन ठरणाऱ्या संघास २ लाखांचे, तर उपविजेत्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूस मोफत मेंबरशिप
प्रत्येक सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूंना हेल्थ अँड हार्मनी जिमतर्फे एका वर्षासाठी मोफत मेंबरशिप मिळणार आहे. स्पर्धेत एकूण २३ खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे.

विजेत्या संघाला गोवा सहल
त्याचप्रमाणे स्मिता हॉलिडेजतर्फे एपीएलच्या अंतिम विजेत्या संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफसह २० ते २२ जणांना गोव्याची सहल असणार आहे. यात २ रात्र आणि ३ दिवस हॉल्ट राहणार आहे.

Web Title: Star cricketer Kedar Jadhav to play in Lokmat APL, know complete schedule of series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.