औरंगाबादच्या कचऱ्यापासून पिशोर येथे खतनिर्मितीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:31 AM2018-09-04T01:31:24+5:302018-09-04T01:32:51+5:30
औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिशोर : औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील महानगरपालिका हद्दीतील कचरा पिशोर येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आणून टाकला होता. औरंगाबादची घाण कन्नड तालुक्यात नको म्हणून आ. जाधव यांच्या या कृतीला जोरदार विरोध झाला होता. यावर आ. जाधव यांनी या कचºयापासून जैविक खताची निर्मिती करून शेतकºयांना मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार कचºयावर बायोकल्चर फवारणी करण्यात येऊन अनेकदा पलटी मारण्यात आली. सोमवारी (दि.३) सकाळपासून स्क्रीनिंग मशीनद्वारे खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसामुळे व्यत्यय आला व खत निर्मिती करण्यास उशीर झाला. सुमारे ८० टन कचºयापासून सुमारे ३० टन जैविक खत निर्माण झाल्याचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बोथे यांनी सांगितले. पूर्ण खत तयार होईपर्यंत आ. जाधव हे रात्री उशिरापर्यंत साईटवर ठाण मांडून होते. आपल्या हातात फावडे घेत स्वत: त्यांनी खत गोणीत भरले. यावेळी त्यांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसून येत होते.
यावेळी पिशोरसह करंजखेड, वासडी, पिंपरखेडा, गौरपिंप्री, नादरपूर तसेच तालुक्यातील गावांतून आलेल्या शेतकºयांनाही हे जैविक खत तयार होताना बघून सुखद
वाटले.
यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र मगर, हतनूरचे पं. स. सदस्य किशोर पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे, सिद्धेश्वर झाल्टे, गणेश ठोकळ, कैलास दहेतकर, योगेश मोकासे, सुरेश हिंजे, अक्रम पठाण, बाबासाहेब जाधव, प्रदीप बोडखे, सूर्यभान जाधव, भास्कर जाधव, शांताराम जाधव, गंपू जाधव, भास्कर सूर्यवंशी, नीलेश नवले, सचिन जाधव आदींसह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांनाही मोफत खत
सदरील कचºयापासून तयार झालेले खत जवळपास ६५० एकर शेतीला पुरेल. विरोधकांनी कचºयाचे राजकारण करून रोगराई पसरेल, अशी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून खत निर्माण होणार नाही, असेही सांगत सुटले होते; परंतु कुणाच्याही आरोग्यास काहीही इजा न होता कचºयापासून खत निर्माण केल्याचा आनंद असून विरोधकांनी मोफत खत आवश्य घेऊन जावे.
-आ. हर्षवर्धन जाधव