भामट्यांचा आॅनलाईन धुमाकूळ सुरूच

By Admin | Published: November 28, 2015 12:41 AM2015-11-28T00:41:43+5:302015-11-28T00:46:57+5:30

औरंगाबाद : सामान्यांना आॅनलाईन गंडा घालण्याचा भामट्यांचा धुमाकूळ जोरात सुरू आहे. अशा प्रकारे आणखी तीन जणांना लाखो रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे

Start the racket online | भामट्यांचा आॅनलाईन धुमाकूळ सुरूच

भामट्यांचा आॅनलाईन धुमाकूळ सुरूच

googlenewsNext


औरंगाबाद : सामान्यांना आॅनलाईन गंडा घालण्याचा भामट्यांचा धुमाकूळ जोरात सुरू आहे. अशा प्रकारे आणखी तीन जणांना लाखो रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कोणालाही आपल्या एटीएम अथवा क्रेडिट कार्डवरील क्रमांक, पासवर्ड सांगू नका, असे वारंवार आवाहन पोलिसांकडून करण्यात येऊनही नागरिक अजून सतर्क झालेले नाहीत.
रोकडिया हनुमान कॉलनी येथील संदीप गोपनपल्लीकर यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून अज्ञात भामट्याने ३४ हजार ८३७ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचे समोर आले. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
पोलिसांनी सांगितले की, क्रेडिट कार्डच्या आधारे खरेदी केल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन आपण अशा प्रकारची कोणतीही खरेदी केली नसल्याचे अधिकाऱ्यांना
सांगितले.
तेव्हा अधिकाऱ्यांनी सायबर भामट्याने फसवणूक केल्याचे सांगितले. त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्र्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक गोवर्र्धन कोळेकर तपास करीत आहेत. अन्य एक घटना प्रभातनगरी येथील देशमुखनगरातील रहिवासी हरीश कुलकर्णी यांच्या बाबतीत घडली. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी (पान ८ वर)

Web Title: Start the racket online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.