‘त्या’ पुलाच्या दुरुस्तीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:02 AM2021-05-29T04:02:01+5:302021-05-29T04:02:01+5:30
सहा महिन्यांतच का पडले भगदाड या महामार्गावरील संबंधित नवीन पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून, तो रहादारीस ...
सहा महिन्यांतच का पडले भगदाड
या महामार्गावरील संबंधित नवीन पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून, तो रहादारीस खुला करण्यात आला आहे. पण बांधकामादरम्यान पुलाच्या दोन्ही बाजूने केवळ मातीचाच सर्वाधिक भर टाकून दबाई करण्यात आली होती. यानंतर त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांतच निकृष्ट काम झाल्याचे पुढे आले. अवकाळी पावसातच टापरगावजवळील शिवना नदी पुलाला दोन्ही बाजूंनी भगदाड पडल्याने पुलास धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने दिले हाेते. या पुलाची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर पावसाळ्यात पुला कोसळण्याची भीती हाेती. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत दोन दिवसांत पुलाच्या दुरुस्तीची काम ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
----- दक्षता घेऊ -----
महामार्गासह पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अवकाळी पाऊस पडल्याने यात पुलाच्या साईड बाजू ढासळल्या. मात्र आमची पेट्रोलिंगची गाडी सतत लक्ष ठेऊन असून, संबंधित काम ठेकेदारास सांगून पक्के करण्यात येत आहे. यानंतर दक्षता घेऊ.
- अरविंद काळे, प्रकल्प संचालक
----- कॅप्शन :
280521\img20210528131717_1.jpg
टापरगावजवळील पुलाच्या दुरुस्तीसाठी आणलेले डब्बर.