शाळा सुरू करा, मुलांचे शैक्षणिक नुकसान होतेय....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:01+5:302021-09-03T04:04:01+5:30
- सविता चव्हाण, पालक -- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. मग केवळ शाळा ...
- सविता चव्हाण, पालक
-- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. मग केवळ शाळा बंद ठेवून काय होणार योग्य काळजी घेऊन शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
-कीर्ती खांडके, पालक
-
पाचवी ते सातवीचे वर्ग तर सुरू व्हावेच. पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानदान सुरू झाले तरच या प्रवेशित विद्यार्थ्यांना भवितव्य आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पालक आग्रही आहेत.
-विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती
-
पालकांकडून शाळेकडे शाळा सुरू करण्यासंदर्भात आग्रह होतोय. विद्यार्थीही घरी आणि ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्याची परवानगी मिळावी.
- प्रल्हाद शिंदे, अध्यक्ष, मेसा संघटना
- मोबाइलचे व्यसन विद्यार्थ्यांत जडत आहे. त्याचे वाईट परिणाम दिसून यायला लागते आहेत. अभ्यासाअभावी विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होऊन, ते नको त्या गोष्टींकडे वळत आहेत. प्रत्यक्ष शाळा लवकर सुरू होणे गरजेच्या आहेत.
-संजय तायडे, अध्यक्ष, मेस्टा संघटना