नेत्ररोग तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 09:33 PM2018-10-26T21:33:27+5:302018-10-26T21:33:53+5:30
औरंगाबाद : तिरळेपणा, डोळ्याची पापणी पडणे, पापण्यांची शस्त्रक्रिया, व्हिडिओंच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अविष्कारांची रेलचेल असलेल्या नेत्ररोग तज्ज्ञांच्या ३८ व्या राज्यस्तरीय परिषेदस शुक्रवारी प्रारंभ झाला. दिवसभर विविध सत्रे झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
औरंगाबाद : तिरळेपणा, डोळ्याची पापणी पडणे, पापण्यांची शस्त्रक्रिया, व्हिडिओंच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अविष्कारांची रेलचेल असलेल्या नेत्ररोग तज्ज्ञांच्या ३८ व्या राज्यस्तरीय परिषेदस शुक्रवारी प्रारंभ झाला. दिवसभर विविध सत्रे झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र व मराठवाडा आॅपथेल्मोलॉजिकल सोसायटी आणि औरंगाबाद आॅपथेल्मोलॉजिकल असोसिएशनतर्फे एमजीएम रुग्णालयाच्या सहकार्यांने ३८ व्या राज्यस्तरीय तीनदिवसीय परिषदेला शुक्रवारी उत्साहात सुरूवात झाली. या परिषदेत राज्याभरातून १२५० नेत्रतज्ज्ञ दाखल झाले आहेत. परिषदेचे उद्घाटन ब्रिटनमधील नॉटिंगहॅम नेत्र विभागाचे प्रमुख आणि दुआ लेअरचे जनक डॉ. हरमिंदरसिंग दुआ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, महाराष्ट्र आॅपथेल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत बावनकुळे, सचिव डॉ. बबन डोळस, नूतन अध्यक्ष डॉ. गोपाल अरोरा, सचिव डॉ. अनंत पांगारकर, वैज्ञानिक समिती प्रमुख डॉ. परीक्षित गोगटे, मराठवाडा संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशन लखमावार, सचिव डॉ. विवेक मोतेवार, संयोजक प्रमुख डॉ. सुनयना मलिक, डॉ. राजीव मुंदडा, डॉ. वर्षा नांदेडकर जोशी, डॉ.धनंजय मावरे, डॉ. सुनील कसबेकर, डॉ. अनंत पिंपरकर, डॉ. केदार नेमीवंत आदी उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमात नूतन अध्यक्ष डॉ. गोपाल अरोरा यांचा पदग्रहण समारंभ झाला.
दिवसभर वेगवेगळे परिसंवाद
परिषदेत प्रत्यक्ष शस्त्रक्रियांच्या प्रात्यक्षिक सत्रात काही कठीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरानी प्रत्यक्ष एमजीएमच्या आॅपरेशन थिएटरमध्ये केल्या आणि त्याचे थेट प्रक्षेपण कार्यशाळेत करण्यात आले. सर्जिकल स्किल ट्रान्सफर कोर्स या कार्यशाळेत १५० डॉक्टर सहभागी झाले होते. याशिवाय दुसऱ्या एका सत्रात संवाद कौशल्य, नेतृत्व विकास, नेत्र पेढी, मेडिको लीगल, अपघात आदी विषयांवर मार्गदर्शन केले. प्रख्यात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मधुमेह व्यवस्थापन आणि नेत्र या विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. राजस देशपांडे, डॉ. हरीश शेट्टी यांचेही विविध कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन झाले. याशिवाय काही निवडक व्हिडिओ दाखविण्यात आले. परिषद स्थळी विविध कंपन्यांनी शंभरावर स्टॉल उभारले असून,त्याद्वारे नवीन यंत्रसामग्री मांडण्यात आली आहे.
फोटो ओळ : एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नेत्रतज्ज्ञ परिषदेच्या उद्घानाला उपस्थित मान्यवर.