इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ

By Admin | Published: June 10, 2014 12:29 AM2014-06-10T00:29:49+5:302014-06-10T00:56:34+5:30

संजय कुलकर्णी , जालना जालना विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रमुख पक्षातील इच्छुक उमेदवारांची नावे चर्चिली जाऊ लागली आहेत. इच्छुक मोर्चेबांधणी करत आहेत.

Start of wishing for beginners | इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ

इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ

googlenewsNext

संजय कुलकर्णी , जालना
जालना विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रमुख पक्षातील इच्छुक उमेदवारांची नावे चर्चिली जाऊ लागली आहेत. इच्छुक उमेदवारही आप-आपल्यास्तरावर मोर्चेबांधणी करत आहेत.
काँग्रेससमवेत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी याही निवडणुकीत होणार किंवा नाही, याविषयीच्या चर्चेनेही जोर धरला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट चालली, मात्र या निवडणुकीत ती चालणार का? निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारामध्ये स्थानिक मुद्यांनाच महत्त्व राहणार का? असे विविध प्रश्न मतदारांच्याही मनात निर्माण झाले आहेत.
विद्यमान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापासून त्यात लक्ष केंद्रित करून काम पूर्ण होईपर्यंत व जालनेकरांना गतवर्षी दुष्काळाच्या भयावह परिस्थितीत पिण्याचे पाणी मिळवून देण्यापर्यंत जे प्रयत्न केले, सत्तेत काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री असताना पाणीप्रश्नावरून सरकारविरुद्ध आंदोलन केले. त्यामुळे आपण पाणीप्रश्न कशा अडचणीच्या काळात सोडविला, हे गोरंट्याल मतदारांमध्ये ठासून सांगणार, हे निश्चित. याशिवाय शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून राबविलेल्या काही विकास कामांवरही ते भर देतील, असे चित्र आहे. हा विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र यावेळी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गेल्यावेळी घनसावंगीतून तर जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना येथून विधानसभा निवडणूक लढविली होती. दोघांचाही पराभव झाला. येत्या निवडणुकीत खोतकर व अंबेकर हे दोघेही इच्छुक आहेत. मात्र खोतकर हे पुन्हा घनसावंगीतून की, जालन्यातून लढणार हे ठरायचे आहे. आंदोलनाद्वारे तसेच प्रसिद्धीपत्रकांद्वारे अंबेकरांनी स्थानिक आमदारांच्या कार्याबद्दल टीका, आरोप करण्याची संधी सोडलेली नाही. तर खोतकरांनी आपला जनसंपर्क जालना व घनसावंगी मतदारसंघात कायम ठेवला. मात्र रावसाहेब दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जालन्यात काढलेल्या मिरवणुकीद्वारे खोतकरांनी दाखविलेला उत्साह काही औरच सांगत होता. शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल, हे येत्या काळात निश्चित होईलच. दुसरीकडे मनसेकडून निवडणूक लढण्यास जिल्हाप्रमुख रवि राऊत हे इच्छुक असून त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दूल रशीद पहेलवान यांनीही मध्यंतरी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. भारिप बहुजन महासंघाकडून सुधाकर निकाळजे हे इच्छुक असून त्यांनीही तयारी सुरू केली आहे.

Web Title: Start of wishing for beginners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.