पॅलेटिव्ह केअर ‘ओपीडी’ला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:48 AM2018-02-06T00:48:34+5:302018-02-06T00:48:39+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवेचे (ओपीडी) सोमवारी उद््घाटन करण्यात आले. या नव्या सेवेमुळे कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवेचे (ओपीडी) सोमवारी उद््घाटन करण्यात आले. या नव्या सेवेमुळे कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळणार आहे.
आजारातील शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील वैद्यकीय उपचाराची मर्यादा संपते. तेव्हा रुग्णांच्या वेदना पाहणे कुटुंबियांना शक्य होत नाही, अशा दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी ‘पॅलेटिव्ह केअर’ची संकल्पना पुढे आली. कर्करोगाच्या रुग्णाच्या वेदना करण्याच्या दृष्टीने पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या ओपीडी सेवेतून रुग्णांच्या वेदना कमी करण्यासह त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन आणि रुग्णांप्रती जागृती के ली जाणार आहे.
उद््घाटनप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. संगीता पाटील, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अर्चना राठोड, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. आदिती लिंगायत, डॉ. विजय कल्याणकर, अभ्यागत समितीचे डॉ. भागवत कराड, राम बुधवंत, रामेश्वर लांडगे, सुनंदा खरात, नारायण कानकाटे आदी उपस्थित होते.
उद््घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. येळीकर म्हणाल्या. टाटा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी घेतलेल्या सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर अखेर पॅलेटिव्ह केअर ओपीडी सुरू झाली. अगदी याचप्रमाणे डॉक्टरांनी नवनवीन उपचार पद्धती शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून रुग्णसेवेत वाढ होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.