उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात
By Admin | Published: September 20, 2014 12:24 AM2014-09-20T00:24:57+5:302014-09-20T00:29:05+5:30
औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांसाठी त्या- त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
राज्यात १२ सप्टेंबरपासून विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशनपत्राची छाननी सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १ आॅक्टोबर ही आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.