बालकांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:32 AM2017-09-25T00:32:34+5:302017-09-25T00:32:34+5:30
अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आज रविवारी चौदावा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामुळे बालकांची पोषण आहाराअभावी उपासमार झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आज रविवारी चौदावा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामुळे बालकांची पोषण आहाराअभावी उपासमार झाली. तथापि, काल शनिवारी शासनाच्या सूचनेनुसार आहार शिजविणाºया बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच आशा कार्यकर्र्तींच्या मदतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सोमवारीही अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषक आहार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी दिली.
११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर गेले आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांना दरमहा ५ हजार रुपये आणि मदतनिसांना २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येते. अन्य राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाºयांना जास्त मानधन दिले जाते. त्याप्रमाणे राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करावी, या व इतर मागण्यांसंदर्भात संप सुरू आहे. शासनाने दोन दिवसांपूर्वीच मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. तथापि, ही तुटपुंजी वाढ अमान्य करीत कृती समितीने संप सुरूच ठेवला आहे. तथापि, शासनाच्या सूचनेनुसार यापुढे संपाचा परिणाम अंगणवाड्यांवर होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या असून, शनिवारी जिल्ह्यातील ४४८ मोठ्या अंगणवाड्यांमध्ये बचत गटांच्या प्रतिनिधी आणि आशा कार्यकर्र्तींच्या सहकार्याने बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला.