राज्य क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:45 AM2019-02-05T00:45:11+5:302019-02-05T00:45:30+5:30
नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
औरंगाबाद : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले.
नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
फायनलमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ११४ धावा केल्या.औरंगाबादकडून नीरज देशपांडे याने ३ तर श्याम टाकळकरने २ गडी बाद केले. कर्णधार रवींद्र तोंडे, मनोज दाभाडे व अनुराग खळीकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्रने विजयी लक्ष्य ११ चेंडू व ६ गडी राखून गाठले. महाराष्ट्राकडून मुजीब पठाणने २३, मनोज दाभाडेने ४१ व नीरज देशपांडेने २६ धावा केल्या. नीरज देशपांडे सामनावीर व मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्याआधी औरंगाबादने सुरुवातीला लातूर, रत्नागिरीचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ठाणे व उपांत्य फेरीत नाशिक संघावर मात केली. विजेतेपद पटकावणारा औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम मंडळाचा संघ : रवींद्र तोंडे (कर्णधार), नीरज देशपांडे (उपकर्णधार), श्याम टाकळकर, मुजीब पठाण, शैलेश सूर्यवंशी, मनोज दाभाडे, योगीराज चव्हाण, अजिंक्य दाभाडे, अंकुश जाधव, अनुराग खळीकर, आकाश कचरे, सुहास चाबुकस्वार, योगेश राठी, इशान कुलकर्णी व अजिनाथ इधाटे.