अड्ड्यांवरील धाडीत ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:09 AM2017-09-18T00:09:42+5:302017-09-18T00:09:42+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू अड्ड्यांवर कारवाया सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू अड्ड्यांवर कारवाया सुरू आहेत. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १४ गुन्हे नोंदविले आहेत, तसेच चार आरोपींना ताब्यात घेतले असून, ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माजलगाव येथील हरियाली हॉटेलवर भरारी पथकाने छापा टाकून संतोष संपती वनवे (३४, रा. हिवरा, ता. माजलगाव) याच्यावर गुन्हा नोंदवून दारू जप्त केली, तसेच बीडचे दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने अर्जुन लक्ष्मण चांदणे (६७, रा. आनंदगाव, ता. शिरूर) याला ताब्यात घेऊन दारूच्या ७२ बाटल्या जप्त केल्या. अंबाजोगाईच्या निरीक्षकांच्या पथकाने विलास भागवत लगड (रा. तेलगाव, रा. माजलगाव) याला ताब्यात घेऊन २० बाटल्या जप्त केल्या. तसेच अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई, परळी तालुक्यात राबविलेल्या कारवाईत १४ हजार ४०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.