राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:06 AM2018-02-01T01:06:55+5:302018-02-01T01:07:34+5:30
औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे कबड्डी खेळासाठी आयुष्य वेचणाºया प्रा. किशोर पाटील यांचा महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रतिभावान खेळाडू घडवण्यात योगदान देणाºया औरंगबाद जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक आणि विविध खेळांतील प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे कबड्डी खेळासाठी आयुष्य वेचणाºया प्रा. किशोर पाटील यांचा महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रतिभावान खेळाडू घडवण्यात योगदान देणाºया औरंगबाद जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक आणि विविध खेळांतील प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात उज्ज्वला पाटील, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष विनोद नरवडे, उदय डोंगरे, फुलचंद सलामपुरे, अब्दुल कदीर, सचिव गोविंद शर्मा, मकरंद जोशी, प्रदीप खांड्रे, सहसचिव दिनेश वंजारे, नीरज बोरसे, अभय देशमुख, विश्वास जोशी, संदीप जगताप, सुरेश मिरकर, मधू बक्षी, बाबुराव अतकरे, लक्ष्मीकांत खिची, युवराज राठोड व जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान : (क्रीडा शिक्षक) : प्राचार्या शशी नीलवंत, आशिष कान्हेड, अप्पासाहेब लघाने, रमेश सोनवणे, राजू जगताप, डी.डी. लांडगे, नीलेश गाडेकर. क्रीडा मार्गदर्शक : डॉ. माणिक राठोड, हिमांशू गोडबोले, कर्मवीर लव्हेरा, प्रवीण गायसमुद्रे, श्यामसुंदर भालेराव, लता कलवार, संजय मुंडे, प्रा. सतीश पाठक, राहुल टाक, मुकेश बाशा, अशोक जंगमे, डॉ. मोहंमद बद्रोद्दीन, अनिल निळे, नितेश काबलिये, सुशांत शेळके, मंगेश डोंगरे, संदीप ढंगारे, राहुल अहिरे, अमृत बिºहाडे, अभिजित देशमुख, संग्राम देशमुख, हर्ष जैस्वाल, चरणजितसिंग संघा, राधिका अंबे, अजय त्रिभुवन, रमेश पालवे, बाजीराव भुतेकर, महेश परदेशी, मोहन शिंदे, गणेश बेटुदे, अक्षय बिराजदार, मछिंद्र राठोड, अर्जुन भुमकर, स्वप्नील गुडेकर, प्रवीण शिंदे, अमरीश जोशी, रोहिदास गाडेकर, आनंद धारकर, अनिल पवार, छाया पालोदकर, जान्हवी जगताप, अनिल मिरकर, विनय साबळे, हर्षल मोगरे, योगेश उंटवाल, भाऊसाहेब मोरे, सोनाली अंबे, संदीप शिरसाठ, सचिन बोर्डे, प्रशांत जमधडे, श्रीनिवास मोतीयळे, प्रवीण आव्हाळे, कैलास शिवणकर, कल्याण गाडेकर, जुनेद शेख, उदय तगारे, मनीषा यादव.
भारतात प्रत्येक खेळात नावलौकिक मिळवणारे खेळाडू तयार व्हायला हवेत. क्रिकेट मोजक्या देशात खेळले जाते; परंतु कबड्डी ३५ देशांत खेळली जात आहे. कबड्डीलाही आता चांगले दिवस येत आहेत. महापौर नंदकुमार घोडेले हे आपले शिष्य आहेत. शिष्याच्या हाताने सत्कार होत असल्याचा आपल्याला आनंद वाटतोय. स्पर्धेमुळे संघर्ष करण्याची वृत्ती विकसित होते. खेळामुळे परदेशात जाण्याची संधी मिळाली, असे किशोर पाटील यांनी या सोहळ्यात सांगितले.
जीवनगौरव पुरस्कार दिला असला तरी आपण खेळातून निवृत्त होणार नाही. राज्य कबड्डी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपण सध्या आहोत. ही अध्यक्ष म्हणून शेवटची टर्म आहे. भविष्यात पदाधिकारी राहणार नसलो तरी कार्यकर्ता म्हणूनही खेळात योगदान देत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष असणाºया किशोर पाटील यांनी याआधी या संघटनेत कार्याध्यक्ष व उपाध्यक्षपदही भूषवले. आठ वर्षांपासून आॅल इंडिया कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष असणाºया किशोर पाटील यांनी अनेक खेळाडूही घडवले. त्यांच्याच कारकीर्दीत महाराष्ट्राने हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले.
‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे गरवारे क्रिकेट मैदान सुरू : महापौर नंदकुमार घोडेले
आंतरराष्ट्रीय दर्जाचे गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदान तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिन्यांनंतरही सुरू झाले नव्हते; परंतु ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे या मैदानाचा लोकार्पण सोहळा होऊन ते खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध झाले, असे या सोहळ्याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
क्रीडा संस्कृती शहरात रुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मनपाच्या वतीने मैदान खेळाडूसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंना संधी मिळावी यासाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असेही महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.