२५ फेब्रुवारी रोजी हिंगोलीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:16 AM2018-02-20T01:16:57+5:302018-02-20T01:17:21+5:30
शहरानजीक असलेल्या अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे रविवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते होणार आहे.
हिंगोली : शहरानजीक असलेल्या अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे रविवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी १४ वर्षांपर्यंत लहान गट व खुला गट, असे दोन गट आहेत. विजयी स्पर्धकांना एकूण १० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत, तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी २४ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन धनराज कांकरिया, अक्षत वीरकुंवर, राहुल भगत, तथागत खंडागळे, विवेक कांबळे, देवीदास चिभडे, जितेश भगत, सज्जन निरगुडे, अंकुश होनमने, अतुल रणवीर, दगडू खिल्लारे, आकाश पाईकराव, सुनील पाईकराव, सुदेश धुळे, अमोल भगत, राजू शिंदे, सतीश कांबळे, गंगाधर कांबळे यांनी केले आहे.