काव्यमैफल समूहाचे राज्यस्तरीय हास्य कविसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:04 AM2021-04-01T04:04:36+5:302021-04-01T04:04:36+5:30

‘दादा म्हणावं तर निघतेया दीदी, शहराची झालीया न्यारीच तऱ्हा, याच्यापेक्षा आपला गाव लय बरा होता’ अशी हास्यकविता सादर करून ...

State level comedy poets' convention of Kavyamaifal group in excitement | काव्यमैफल समूहाचे राज्यस्तरीय हास्य कविसंमेलन उत्साहात

काव्यमैफल समूहाचे राज्यस्तरीय हास्य कविसंमेलन उत्साहात

googlenewsNext

‘दादा म्हणावं तर निघतेया दीदी, शहराची झालीया न्यारीच तऱ्हा, याच्यापेक्षा आपला गाव लय बरा होता’ अशी हास्यकविता सादर करून शेख शब्बीर यांनी शहरीय संस्कृतीची झालेली अधःपतनाची व्यथा आपल्या रचनेतून मांडली.

वाशीमचे कवी गोपाल खाडे म्हणाले की, ‘तिचं वागणं असं की पिरेमानं पिरेमानं।

आवाज तिचा आला की बीपी वाढते धाकानं’ ‘आमचं असं हो पटतं काय सांगू हो तुमाल्, मी घालतो हेल्मेट घेते जवा ते बेलण्याल...’ ही दाम्पत्याच्या जीवनावर आधारित कविता सादर करून उपस्थितांची हास्यदाद मिळविली.

कविसंमेलनात सिल्लोडचे कवी बद्रिनाथ भालगडे यांनी प्रेमीजनांची फसगत ही कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली. उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर राज्यभरातील अनेक कवी-कवयित्रींनी सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी पवन ठाकुर यांनी केले, तर काव्यमैफल टीमचे गझलकार परवेझ शेख यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी निखिल सोनवणे, सुनील भालगडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: State level comedy poets' convention of Kavyamaifal group in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.