राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विनर्स संघ उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:45 AM2018-01-12T00:45:14+5:302018-01-12T00:47:13+5:30

हिमांशू मुकिंद याची भेदक गोलंदाजी आणि यश यादव याचे शानदार अर्धशतक या बळावर औरंगाबाद येथील विनर्स क्रिकेट अकॅडमीने अहमदनगर येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय सी.जी. करंडक क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्याच साई अकॅडमीवर १ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला.

In the state-level cricket tournament, Winners' team is in the semi-finals | राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विनर्स संघ उपांत्य फेरीत

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विनर्स संघ उपांत्य फेरीत

googlenewsNext

औरंगाबाद : हिमांशू मुकिंद याची भेदक गोलंदाजी आणि यश यादव याचे शानदार अर्धशतक या बळावर औरंगाबाद येथील विनर्स क्रिकेट अकॅडमीने अहमदनगर येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय सी.जी. करंडक क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्याच साई अकॅडमीवर १ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. या विजयाबरोबरच या संघाने उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.
साई अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना ३९.४ षटकांत सर्वबाद १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून अभिषेक भुमे याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. आकाश बोराडेने ४०, धीरज बहुरेने ३० व अजय रावलकरने १५ धावा केल्या. विनर्स क्रिकेट अकॅडमीतर्फे हिमांशू मुकिंद याने भेदक मारा करताना ८ षटकांत फक्त २४ धावा देत ७ गडी बाद केले. त्याला हरमितसिंगने २७ धावांत २ व यश यादवने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात यश यादवच्या सुरेख अर्धशतकी खेळीच्या बळावर विनर्स अकॅडमीने विजयी लक्ष्य ३९.२ षटकांत ९ गडी गमावून १७२ धाव करीत गाठले. यश यादवने ६७, करण लव्हेरा याने ३२ आणि सूरज जाधवने १६ धावांचे योगदान दिले. साई अकॅडमीकडून प्रीतेश सोनवणे, ओंकार गुंजाळ, श्रीहर्ष पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. सात गडी बाद करणारा हिमांशू मुकिंद हा सामनावीर ठरला. उपांत्य फेरी गाठणाºया विनर्स अकॅडमीला कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title: In the state-level cricket tournament, Winners' team is in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.