हिंगोलीत रंगले राज्यस्तरीय कवि संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:55 AM2017-09-11T00:55:37+5:302017-09-11T00:55:37+5:30
शहरातील जि. प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणात १० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय काव्य संमेलन प्रसिद्ध साहित्यीक फ. मू. शिंदे यांच्या कवितांनी रंगले. यावेळी राज्यातील २३ जिल्ह्यातून जवळपास शंभरच्यावर कवी-कवायत्रीनीं संमेलनात हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जि. प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणात १० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय काव्य संमेलन प्रसिद्ध साहित्यीक फ. मू. शिंदे यांच्या कवितांनी रंगले. यावेळी राज्यातील २३ जिल्ह्यातून जवळपास शंभरच्यावर कवी-कवायत्रीनीं संमेलनात हजेरी लावली.
संमेलनात शिक्षिका सिंधूताई दहिफळे यांच्या ‘भिजव सारा गाव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, न. प. नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगांवकर, माजी आ. गजानन घुगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, उप शिक्षणाधिकारी देविदास इंगोले, माजी शिक्षण सभापती डॉ. वसंतराव देशमुख, साहित्यीक प्रा. विलास वैद्य, अशोक अर्धापूरकर, गट शिक्षणाधिकारी नवनाथ थोरात, रूचा शिंदे, कृ.ऊ.बा .चे सचिव डॉ. जब्बार पटेल, डायटचे प्राचार्य डॉ. गणेश शिंदे, नगरसेवक बिरजू यादव, निशाताई विसपुते, राजेंद्र सगर, विलास सपकाळ, महासेन प्रधान, दिपक सपकाळ आदीं उपस्थित होते. कवि संमेलनात लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पूणे, धुळे नाशिक, जालना औरंगाबादसह एकूण २३ जिल्ह्यातील कवि-कवायत्रीं काव्य संमेलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश येवले यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गजानन बोरकर यांनी मानले. प्रास्ताविक शिवलींग साखरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी विश्वनाथ सुर्यवंशी, प्रकाश निळकंठे, श्रीराम महाजन, रमेश जाधव, सुभाष जिरवणकर, ज्ञानेश्वर ठाकरे, दामोदर ताटे, देशमुख, सुरेश वानखेडे, अनिस शहा, निमदेव, विजय खिल्लारी, अशोक डोणे, सोयब, बाळकृष्ण ईटकरे, मारोती निरगुडे, एकनाथ मुटकुळे, अभिजित गिरबिडे, नागोराव शिरामे, सुर्यवंशी, सावंत, सोनुने, अफरोज बाजी, खमरूनिसा बेगम, अन्सारी, मोहन पवार आदींनी घेतले.