राज्य उत्पादन विभागाचा छापा; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:47 AM2017-09-27T00:47:11+5:302017-09-27T00:47:11+5:30
तालुक्यातील पेडगाव येथील शेकुराव तुकाराम पोले देशी दारुची अवैध विक्री करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज छापा मारुन सदर इसमास अटक केली. ८४२ रूपये किमतीचा जप्त केला. आरोपीविरूद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील पेडगाव येथील शेकुराव तुकाराम पोले देशी दारुची अवैध विक्री करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज छापा मारुन सदर इसमास अटक केली. ८४२ रूपये किमतीचा जप्त केला. आरोपीविरूद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आरोपींनी सिरसम येथील डी.बी. जैस्वाल यांच्या देशीदारु किरकोळ विक्री दुकानातून विनापरवाना आणल्याचे सांगितले. तसेच मागील अनेक महिन्यांपासून विनापरवाना देशी दारू दुकानदारांकडून आणून त्याची विक्री करीत असल्याचा जबाब आरोपीने दिला आहे. यामुळे संबंधित डी.बी. जैस्वाल यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती निलंबित अथवा रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली असून याबाबत समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधीताची अनुज्ञप्ती निलंबित किंवा रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीत सर्व अनुज्ञप्तीधारकाने आचारसंहितेचे अनुज्ञप्तीच्या नियम व अटीचे पालन करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क हिंगोली कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाºयांची गय केली जाणार नसून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,असा इशाराही दिला.