विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाचे खेळाडू चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:37 AM2017-11-16T00:37:28+5:302017-11-16T00:37:40+5:30
देवगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. बुलडाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तेजस गावंडे, सूरज गवळी, अदिती दाभाडे यांनी कास्यपदक जिंकले. सांगली येथील राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत अभयसिंह हजारी याने रौप्य, ऋतिका कांबळे व साक्षी जगताप यांनी कास्यपदक जिंकले. पुणे येथील राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी गणेश गायकवाड व वैभव गाडेकर यांची निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. बुलडाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तेजस गावंडे, सूरज गवळी, अदिती दाभाडे यांनी कास्यपदक जिंकले. सांगली येथील राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत अभयसिंह हजारी याने रौप्य, ऋतिका कांबळे व साक्षी जगताप यांनी कास्यपदक जिंकले. पुणे येथील राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी गणेश गायकवाड व वैभव गाडेकर यांची निवड झाली. औरंगाबाद येथील राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेत विधी धर्माधिकारी हिने वैयक्तिक आणि सांघिक गटात रौप्यपदक जिंकले. गोंदिया येथील राज्य वुशू स्पर्धेत नमिता जोशी हिने रौप्य, शिवम दसरे याने कास्यपदक जिंकले. अलिबाग येथे होणाºया राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी हर्षल भुईगळ, गगन जोशी, रामअवतार गुर्जर, राधिका शर्मा, आचल विश्वकर्मा, गायत्री काळवे, मृणाली दिवेकर यांची निवड झाली. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख प्रा. एकनाथ साळुंके, प्रा. रणजित पवार, प्रा. किशोरी हिवर्डे, मंगल शिंदे, गणेश बेटुदे, अविनाश वाडे, सुरेश आघाव, शेख शफिक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल म.शि.प्र. मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, सदस्य पंडितराव हर्षे, मोहनराव सावंत, त्र्यंबकराव पाथ्रीकर, प्राचार्य शिवाजीराव थोरे, रजनीकांत गरुड, संभाजी कमानदार, प्रदीप सोळुंके यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.