मका खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:04 AM2021-01-22T04:04:27+5:302021-01-22T04:04:27+5:30
सोयगांव येथे शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन होऊन एक महिना झाला. मात्र, अजून एकाही शेतकऱ्याची मका खरेदी करण्यात आलेली ...
सोयगांव येथे शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन होऊन एक महिना झाला. मात्र, अजून एकाही शेतकऱ्याची मका खरेदी करण्यात आलेली नाही. बाहेर व्यापारी कवडीमोल भावात मका खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून शासनाच्या हमीभावापासून शेतकरी वंचित राहात आहेत. गुरुवारी शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रवीण पांडे यांची भेट घेत मका खरेदी सुरू करण्याची मागणी केली. नसता, प्रजासत्ताक दिनी मका वाहनांसह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राजू चौधरी, गणेश बागले, कडुबा मानकर, त्र्यंबक चौधरी, दगडू तेलंगरे, प्रमोद पाटील, सुनील काळे, रवी काळे, राजू दुतोंडे, विश्वनाथ आगे, पुनम परदेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनानंतर तहसीलदार पांडे यांनी खरेदी विक्री संघाला तत्काळ मका खरेदी करण्याचे आदेश दिले.